मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी पुण्यातील वारजे येथून अटक केली आहे. सदर आरोपीने दारूच्या नशेत सोमवारी रात्री पोलिसांना ११२ या क्रमांकावर कॉल करून मुख्यमंत्र्यांना मारण्याची धमकी दिली होती.


मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना सोमवारी रात्री ११२ क्रमांकावर फोन आला. ज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” असे बोलून कॉलरने कॉल कट केला. डायल ११२ चे कंट्रोल रुम नागपूरमध्ये आहे. तिथेच हा कॉल आला होता. या कॉलनंतर पोलीस सतर्क झाले. कॉल कुठून आला होता याचे लोकेशन त्यांनी ट्रेस केले. पोलिसांना मिळालेल्या लोकेशननुसार कॉल पुण्यातील वारजे इथून आला होता.


त्यानंतर पोलीस या ठिकाणी पोहोचले आणि एका व्यक्तीला ताब्यात घेतले. परंतु, पोलिसांनी या इसमाला ताब्यात घेतले तेव्हा तो दारुच्या नशेत होता. पहिल्यांदा त्याने ऍम्ब्युलन्ससाठी कॉल केला होता. परंतु, ऍम्ब्युलन्स आली नाही म्हणून त्याने डायल ११२ कॉल करुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकण्याची धमकी दिली.


पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी नशेखोर असून त्याने नशेच्या अंमलाखाली मुख्यमंत्र्यांना धमकी दिली.

Comments
Add Comment

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

बहुपत्नीत्वामुळे महिला संकटात

पुणे: देशभरातील मुस्लीम महिलांच्या जीवनात अस्थिरता निर्माण करणाऱ्या बहुपत्नीत्व प्रथेला तातडीने कायदेशीर

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ७५ हजार २८६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री अजित पवार यांनी एकूण ७५ हजार २८६ कोटी

महाराष्ट्र विधान परिषदेचे हिवाळी अधिवेशन सुरू, वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष गायन

नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन सोमवार ८ डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून नागपूर येथे सुरू झाले. या अधिवेशनाची

अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावरून गदारोळ;महाविकास आघाडीच्या काळात अधिवेशन फक्त पाच दिवसाचं होतं !!तेही मुंबईतच

नागपूर: नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात अधिवेशनाचा कालावधी

तुकडा बंदी कायद्यातील सुधारणेसाठी विधेयक विधानसभेत सादर

नागपूर: आजपासून सुरू झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या राजकारणात एक