देशात २४ तासांत ५,६७६ नवे कोरोना रूग्ण
नवी दिल्ली : भारतामध्ये मागील २४ तासांत ५ हजार ६७६ नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. सध्या देशात एकूण सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या ३७ हजार ०९३ वर पोहचली आहे.
देशातील कोरोना रूग्णवाढीचा दर पाहता आरोग्य यंत्रणा अलर्ट मोड वर काम करत आहे. देशात सध्या मॉक ड्रिल्स घेऊन आरोग्ययंत्रणेची सुसज्जता देखील तपासली जात आहे.
दरम्यान, देशात काल कोरोना व्हायरसच्या ५ हजार ८८० नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. दिवसागणिक देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यातही वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.