Sunday, October 26, 2025
Happy Diwali

कोण शिक्षणमंत्री? नारायण राणे भडकले

कोण शिक्षणमंत्री? नारायण राणे भडकले

सिंधुदूर्ग: केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मध्यस्ती केल्यानंतर तब्बल १४ दिवस सुरू असलेले हे डी. एड बेरोजगारांचे उपोषण रविवारी रात्री उशिरा मागे घेण्यात आले आहे. मात्र, जे आंदोलन नारायण राणे यांच्यामुळे मागे घेतले गेले त्याचे श्रेय दिपक केसरकर घेत असल्याचे दिसून आले आहेत. आंदोलकांपैकी एकाने शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या संदर्भात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना माहिती दिल्यानंतर नारायण राणे चांगलेच भडकले आणि सर्वांसमोरच म्हणाले ‘कोण शिक्षणमंत्री?’

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मध्यस्थीनंतर अखेर डी.एड बेरोजगारांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी संध्याकाळी उशिरा ओरोस येथील डी.एड बेरोजगारांच्या उपोषणास भेट दिली. गंल्या १४ दिवसांपासून या डी.एड बेरोजगारांनी विविध प्रश्नासाठी सिंदुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे उपोषण सुरु केले होते.

नारायण राणे म्हणाले की, तुमचे प्रश्न महत्वाचे आहेत. मी उद्या मुंबईत गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. राज्यातील डी. एड बेरोजगारांचे प्रश्न त्यांच्या समोर मांडणार आहे. तसेच योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >