Monday, July 15, 2024
Homeक्रीडारिंकूच्या ‘त्या’ खेळीने विक्रमाला गवसणी

रिंकूच्या ‘त्या’ खेळीने विक्रमाला गवसणी

एका षटकात ५ षटकारांसह २०व्या षटकात सर्वाधिक धावांचा पराक्रम

अहमदाबाद (वृत्तसंस्था) : गुजरातविरुद्धच्या सामन्यात रिंकू सिंगने शेवटच्या षटकात सलग ५ षटकार लगावत अशक्यप्राय वाटणारा विजय कोलकाताकडे खेचून आणला. या तुफानी खेळीसह रिंकूने विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलमध्ये एका षटकात पाच षटकार मारण्याच्या विक्रमासह रिंकू सिंगने २०व्या षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावे केला.

अखेरच्या षटकात २९ धावांची गरज असताना रिंकू सिंगने पाच षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला. या खेळीसह रिंकूने विक्रमाला गवसणी घातली. आयपीएलमध्ये एका षटकात पाच षटकार मारण्याचा विक्रम रिंकू सिंगने आपल्या नावावर केला. त्याशिवाय २०व्या षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आता त्याच्या नावे झाला आहे.

रोहित शर्माने २००९ मध्ये केकेआरविरुद्ध शेवटच्या षटकात २२ धावा तडकावल्या होत्या. महेंद्रसिंह धोनीने २०१६ मध्ये २० व्या षटकात २२ धावा फटकावल्या होत्या. या दोघांनाही मागे टाकत रिंकूने या विक्रमावर नाव कोरले. रिंकू सिंगने रविवारच्या सामन्यातील शेवटच्या षटकात ३० धावा चोपल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -