
- काव्यकोडी: एकनाथ आव्हाड
गाणे माझे आनंदाचे उत्साहाचे, उधाणाचे चैतन्याच्या लाटेवर स्वार होऊन म्हणायचे
गाणे माझे शेतावरचे विहिरीतल्या मोटेवरचे झुळझुळत वाहणाऱ्या पाटाच्या पाण्यावरचे
गाणे माझे झाडांचे पाना-फुला वेलींचे फळापरी रसाळ अन् आंबट-गोड बोलींचे
गाणे माझे पाखरांचे फिरत राही रानावर सुरात सूर मिसळण्यास वाराही होई अनावर
गाणे माझे सर्वदूर सुगंधापरी दरवळते सृष्टीचे संगीत अलगद गाण्यात येऊन मिसळते
गाणे माझे आभाळाचे सूर्य, चंद्र अन् ताऱ्यांचे हसणाऱ्या, बागडणाऱ्या लहानथोर साऱ्यांचे
१) गोड खाद्यपदार्थांत हमखास वापरतात, विड्याच्या पानातही वापर याचा करतात मसाल्यात नेहमीच वापर याचा जास्त मुखदुर्गंधीनाशक कोणता हा पदार्थ ?
२) पुलाव, बिर्याणीत याचा एक तुकडा तरी असतो तिखट-गोड चवीमुळे पदार्थ रुचकर करतो याच्याच वाळलेल्या पानांचे तमालपत्र नाव खरं याच्याच खोडाच्या सालीचे नाव काय नाव बरं?
३) चिनी पाककृतीतील ही महत्त्वाची वनस्पती अष्टकोनीय आकारासारखी मसाल्यात दिसते ती गरम मसाल्यात याचा वापर करतात खास पुलाव, बिर्याणी कुणामुळे होते एकदम झकास?
उत्तर -
- चक्रफूल
- दालचिनी
- वेलदोडा
eknathavhad23 @gmail.com