Sunday, July 21, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनआयुष्य कसं जगायचं ठरवूया!

आयुष्य कसं जगायचं ठरवूया!

  • दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम

आपलं आयुष्य म्हणजे काय… एक सुखाचं गाणं… प्रत्येकजण स्वतःच्याच सुखासाठी जगत असतो. फक्त माणसांगणिक सुखाची व्याख्या बदलत असते इतकंच. कोणी आत्मिक सुख महत्त्वाचं मानतो, तर कोणी भौतिक सुखासाठी धडपडत राहतो. पण सगळ्यांनाच दुःखात नक्कीच राहायचं नसतं.

पण मग नक्की योग्य काय आत्मिक सुख की भौतिक सुख. अर्थातच ज्यात आपला आत्मा, आपलं मन सुखी समाधानी असेल ते खरं सुख म्हणावं लागेल. जे काही आहे ते सगळं आपल्याच मानाच्या ताब्यात आहे. फक्त गरज आहे ती मनाला योग्य विचारांचे वळण देण्याची. जर कुणाला आत्मिक सुखात समाधान असेल, पण त्याच्याप्रमाणे घरातले विचार करत नसातील, तर त्याचं आयुष्य नक्कीच अशांत राहणार आणि एखाद्याला घरात टीव्ही, फ्रिज महागाडी गाडी दागिने यातून मानसिक सुख मिळत असेल, तर त्याला चॅलेंज कसं करायचं? पण या गोष्टी मिळवताना तो माणूस जर चुकीच्या स्पर्धेत किंवा मार्गांवरून जातं असेल, तर तो ताणातून जात असणार, हेही तितकंच सत्य आहे.

हा विषय मांडण्याचं कारण म्हणजे अकाली होतं असलेले मृत्यू! आजूबाजूला बघितलं तरी लक्षात येतं की, अगदी लहानपणापासून बघितलेल्या तरुणाचे अकाली निधन झालंय, कुणाचा नवरा, कुणाचा पिता, मुलगा भाऊ अकालीच निघून गेलाय. त्यातही हृदयरोग आणि त्यातही कार्डियाक अरेस्टने तरुण मुलं, मुली अवघ्या पस्तीस-चाळीशीतच आपला जीव गमावून बसली आहेत.

या वयात खरं तर आयुष्य नवं वळण घेत असतं. नोकरीच, व्यवसायात सिद्ध होण्याची धडपड, माणसारखी किंवा मनासारखा जोडीदार मिळण्याची धाकधूक, संसार, मुलं यांची जबाबदारी आल्यावर ती समजून थोडं चुकून त्यातून शिकून स्थिरस्तावर झालेले हे वय. आपल्याच आयुष्याच्या भूतकाळाकडे आणि भविष्याकाळाकडे डोळे विसफारून बघण्याचे वय. आयुष्य नक्की कसं आहे? हे समजून घेण्याचं वय. याचं वळणावर अनेक तरुण आपला जीव कर्डियाक अरेस्ट नावाच्या काही सेकंदात होत्याच नव्हतं करून टाकणाऱ्या हृदयरोगाने त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो आहे.

यावर अनेक मुद्द्यांनी ऊहापोह होऊ शकतो. पण यात खरा मुद्दा आहे तो आपल्याच प्रकृतीला गॅरेन्टेड धरत सुख या खरी व्याख्याच न समजलेल्या गोष्टीच्या मागे न थांबता धावणे होय. हल्ली लवकर सेटल व्हायचं असतं, ते होतही येतं. पण त्यासोबत अस्वस्थता, गमावून बसण्याची भीती, सत्तेत असाल, तर पराजायची भीती, टिकून राहण्याचा अट्टहास, त्यासाठी केलेले अनेक अॅडजस्टमेंट, कुटुंब सुखापासून झालेली फारकत, कामं, आजूबाजूच्या वातावरणातून येणाऱ्या तणावावर उपचार असतात, त्या कुटुंबाला सुखामध्ये पण वेळ नसतो. आई-बाबांच्या, पत्नीच्या, मुलांच्या सोबत क्षण घालव्याला वेळ नसतो, आतातर नाते संबंधातसुद्धा व्यवहार आले आहेत. एक व्यवहार म्हणून अनेकदा नाते बांधले जाते आणि मग सुखाचे वेगळे मार्ग शोधले जातात. माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो. पण मनाला समाधानी करण्यात अपयशी झाला, तर तो बेचैन होतो आणि त्या सगळ्याचा ताण त्याच्या हृदयावर येतो हे साहजिक लक्षण आहे आणि सगळं भयंकर आहे.

भारतीय संस्कृतीत कुटुंब व्यवस्थेला खूप मोठं महत्त्व आहे. कुटुंब भक्कम पाठीशी असेल, तर जग जिंकता येतं याची अनेक उदाहरणे आहेत. सुख म्हणजे काय, समाधान म्हणजे नेमकं काय, भौतिक सुखासाठी, स्पर्धेसाठी किती धावायचे? याचेही काही प्रमाण आहे. आपल्याला आपल्या आयुष्यात शेवटी काय हवे आहे, हे एकदा निश्चित झाले, तर आयुष जगणं सोपं जातं. मात्र विचार होणे अवशयक आहे. यावर अगदी सोपा मार्ग मेडिटेशन आहे. त्यातून आपलंच मन आपल्याला समजू लागतं, त्याला नेमकं काय हवयं हे समजत. आयुष्याचा नेमका मार्ग सापडतो आणि मग जगणं ताणविरहित होऊन जातं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -