साहाय्यकारी पंढरी

  273


  • कथा: प्रा. देवबा पाटील


पंढरीने आईला सगळी कथा सांगितली. सीताबाईंना त्याची परोपकारी वृत्ती बघून आनंदच झाला. त्यांनी पुन्हा त्याला घरातील तिच्या हिश्श्याची भाजी-भाकरी बांधून दिली. पुन्हा पंढरीची स्वारी शेताकडे निघाली.

ईटगाव नावाच्या गावात पंढरी नावाचा एक मुलगा होता. त्याचे वडील मजूर असल्याने त्याच्या घरची परिस्थिती गरिबीची हाती. त्यामुळे पंढरीला बालपणापासूनच सुटीच्या दिवशी शेतमजुरीची सारी कामे करावी लागली. त्याचे वडील गावतच एका जमीनदाराकडे सालदार म्हणून कामाला होते नि आईसुद्धा मोलमजुरी करायची. पंढरीला शेतात जाण्याचा दांडगा उत्साह होता. एकदा अशीच शनिवारची सकाळची शाळा सुटली. त्या दिवशी पंढरीने शेतात जाण्याचे ठरविले. तो आपल्या आईजवळ गेला नि त्याने आईला विचारले. आईने पंढरीला डबा तयार करून दिला. पंढरी तो डबा घेऊन आपल्या शेताच्या रस्त्याने निघाला. शेताच्या रस्त्याने मस्त निसर्गाचे हिरावेगार सौंदर्य बघत पंढरी मजेत डुलत डोलत चालला असताना एका निंबाच्या झाडाखाली बसलेल्या म्हातारीकडे त्याची नजर गेली. एकदम हताश होऊन ती म्हातारी तेथे बसलेली होती. बाजूलाच तिची झाडांच्या वाळलेल्या फांद्यांच्या काड्याकुड्यांची मोळी पडलेली होती. तिला असे बसलेले पाहून पंढरी तिच्याजवळ गेला नि त्याने आपुलकीने तिला विचारले, ‘आजीबाय, तुमी अस्या नाराज होऊन काऊन बसल्या?’


‘काय सांगू बाबू तुले, ती बोलू लागली, आज काळ्याकुळ्या गोळा करता करता माही झाडाले बांधलेली पालवातली भाकरच एका वान्हेरानं नेली. मीनं कायीच खायेल नसल्यानं आता मले चक्कर यियाले लागला म्हनून जराक बसली.’


पंढरीने आपल्या पिशवीतून आपली न्याहरी बाहेर काढली व त्या म्हातारीला दिली. ती नको म्हणत असतानासुद्धा पंढरीने तिला प्रेमळपणे आग्रह करीत त्यातील भाजी-भाकरी खाऊ घातली. शेजारच्या मळ्यातील विहिरीवरून मस्त गार गार, गोड गोड पाणी आणून तिला प्यायला दिले. तिला आता थोडी तरतरी आली. तिचे खाणे संपल्यानंतर तिची मोळी उचलण्यास मदत करीत तिच्या डोक्यावर ठेवून दिली. ती चालायला लागली. मोळी उचलताना ती चांगलीच वजनदार असल्याचे पंढरीला जाणवले. एवढे वजन ती म्हातारी दररोज कसे पेलवत असेल? याची त्याला शंका वाटली. त्याने त्या आजीकडे वळून बघितले तेव्हा चालताना तिचे पाय लटपटत आहेत, असे त्याला दिसले. पुन्हा त्याने म्हातारीला आवाज दिला. ती नाही नाही म्हणत असतानासुद्धा त्याने तिच्याजवळ जाऊन तिच्या डोक्यावरची मोळी खाली उतरविणे सुरू केले. म्हातारीने मोळी सोडली. तिच्या दोन छोट्या-छोट्या मोळ्या करायला पंढरीने तिला मदत केली. एक मोळी तिच्या डोक्यावर उचलून दिली व दुसरी आपल्या डोक्यावर उचलून घेतली व तिच्यासोबत गावाकडे चालू लागला. पंढरीने गावात आल्यानंतर त्या म्हातारीच्या झोपडीपर्यंत मोळी पोहोचवून दिली. तेथेच आपल्या डोक्यावरचा कचरा झटकून साफ केला व आपल्या घराकडे निघाला. त्याला इतक्या लवकर परत आलेला बघून पंढरीच्या आईने त्याला आश्चर्याने विचारले, पंढरी बाळा, कित्ती आनंदानं अन् घाईघाईनं तू मळ्यात गेला अन् इतक्या लौकर काहून वापस आला? पंढरीने आईला सगळी कथा सांगितली. सीताबाईंना त्याची परोपकारी वृत्ती बघून आनंदच झाला. त्यांनी पुन्हा त्याला घरातील तिच्या हिश्श्याची भाजी-भाकरी बांधून दिली. पुन्हा पंढरीची स्वारी शेताकडे निघाली. आई पुन्हा स्वत:साठी भाकरी बडवायला लागली.


दुस­ऱ्या दिवशी जेव्हा त्याच्या वडिलांच्या मालकांना पंढरीच्या परोपकाराची माहिती कळली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला व त्यांनी पंढरीच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण भार स्वत:च्या खांद्यावर घेतला. आपण चांगलं काम केलं, तर देवही आपलं चांगलंच करतो, याचा प्रत्यय पंढरीला आला.

Comments
Add Comment

गोष्ट एका उंदराची!

कथा : रमेश तांबे एक होता उंदीर. तो एका घरात राहायचा. घरभर फिरायचा. मि

सूर्य चालताना का दिसतो?

कथा : प्रा. देवबा पाटील आदित्यची त्याच्यासारख्याच एका हुशार पण गरीब मुलासोबत आता चांगली ओळख झाली होती. तो मुलगा

इलो मिरग

वैष्णवी भोगले खरंच कोकणातल्या मिरगाच्या पावसाची एक वेगळीच मज्जा असते. कोकण तसं वर्षभर सुंदर दिसलं तरी अधिक

सिडनीमध्ये मुंबईचा वडा-पाव

अजित राऊत आम्ही ऑस्ट्रेलियात अनेक प्रेक्षणीय ठिकाणी फिरलो. त्यातील प्रमुख म्हणजे सुप्रसिद्ध ऑपेरा हाऊस, तसेच

काव्यकोडी

एकनाथ आव्हाड गुरुजी गुरुजी आमचे रोजच फळ्यावर लिहायचे सुविचार म्हणायचे सुविचारासारखा

मेरी बात और हैं...

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे साहिर म्हणजे तरल शायरीचा हॉलमार्क! हळव्या, उत्कट भावना तळहातावर घेऊन तुमच्या