दिल्लीच्या पराभवाची हॅटट्रिक; राजस्थानचा मोठा विजय

गुवाहाटी (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या १६व्या हंगामात शनिवारी झालेल्या पहिल्या लढतीत राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सवर ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. ३ सामन्यातील राजस्थानचा हा दुसरा विजय ठरला तर दिल्लीने पराभवाची हॅटट्रिक केली. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय दिल्लीच्या अंगलट आला. राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या १२ चेंडूत ८ चौकार मारले. यशस्वीने फक्त २५ चेंडूत अर्धशतक केले. तो बाद झाल्यानंतर बटलरने ३२ चेंडून ५० धावा पूर्ण केल्या. राजस्थान २५० पर्यंत मजल मारेल असे वाटत होते. पण त्यांनी १९९ धावांपर्यंत मजल मारली.


सांघिक कामगिरीच्या जोरावर राजस्थानने दिल्लीवर रॉयल विजय मिळवला. राजस्थानने दिलेले २०० धावांचे आव्हान दिल्लीला पेलवले नाही. त्यांचा डाव १४२ धावांवर आटोपला आणि राजस्थानने ५७ धावांनी विजय मिळवला. जोस बटलर आणि यशस्वी जायस्वाल यांच्या वादळी फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे राजस्थानने हा विराट विजय मिळवला. दिल्लीचा हा सलग तिसरा पराभव, म्हणजेच पराभवाची हॅट्ट्रिक होय. या पराभवामुळे दिल्ली गुणतालिकेच्या तळाशी पोहोचली आहे. राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली २० षटकात ९ विकेटच्या मोबदल्यात १४२ धावांपर्यंत मजल मारू शकली.


दिल्लीचा युवा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ आज पुन्हा अपयशी ठरला. त्याला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. सलग तीन सामन्यात पृथ्वी शॉ स्वस्तात तंबूत परतला आहे. त्याला खातेही उघडता आले नाही. दिल्लीची सुरुवातच खराब झाली. २०० धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीचे पृथ्वी शॉ आणि मनीष पांडे हे एकापाठोपाठ एक तंबूत परतले. दोघांनीही खाते उघडता आले नाही. राजस्थानच्या गोलंदाजीपुढे दिल्लीच्या फलंदाजांनी चक्क नांगी टाकली. डेव्हिड वॉर्नर आणि ललित यादव यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. पृथ्वी शॉ आणि मनीष पांडे यांना खातेही उघडता आले नाही. तर रायली रुसो १४ धावा काढून तंबूत परतला. अक्षर पटेल आणि रोवमन पॉवेल यांनी प्रत्येकी दोन - दोन धावांचे योगदान दिले.

Comments
Add Comment

शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर! 'या' खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी

मुंबई : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. ईडन गार्डनवर झालेल्या

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या

आज भारत-बांगलादेश सामना; टॉस, वेळ आणि लाइव्ह स्ट्रीमिंग अपडेट

मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यात आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेतील सेमी फायनलचा पहिला सामना २१नोव्हेंबर रोजी

भारताच्या लेकींची सुवर्ण हॅटट्रिक!

जागतिक बॉक्सिंग कप : मीनाक्षी, प्रीती आणि अरुंधतीचा 'गोल्डन पंच' नवी दिल्ली : जागतिक बॉक्सिंग कपच्या अंतिम फेरीत

द. आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत भारताचे नेतृत्व पंत की राहुलकडे?

दुखापतीमुळे कर्णधार शुभमन गिलवर टांगती तलवार मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी

शुभमन गिल बाहेर; साई सुदर्शनला मिळणार कसोटीची संधी

गुवाहाटी : पहिल्या कसोटी दरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीनंतर शुभमन गिलची मैदानात पुनरागमन करण्याची शक्यता कमी