Saturday, April 19, 2025
Homeसाप्ताहिककोलाज‘ज्ञानेश्वर माऊली’ने गाठला ५०० भागांचा टप्पा

‘ज्ञानेश्वर माऊली’ने गाठला ५०० भागांचा टप्पा

  • ऐकलंत का!: दीपक परब

‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेने संतांची परंपरा उलगडत प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केले आहे. माऊली आणि त्यांची भावंडे यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारे काही प्रेक्षकांना खूपच भावले. ‘ज्ञानेश्वर माऊली’ मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. या मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळते आहे. आळंदीच्या ग्रामस्थांना माऊलींच्या दिव्यत्वाचे दर्शन वेळोवेळी होते आहे. माऊली आणि त्यांची भावंडे यांचे चमत्कार ग्रामस्थांना पाहायला मिळाले.

या मालिकेत माऊली आणि त्यांची भावंडे यांच्याबरोबरच संत सेना महाराज यांची भेट झाली. आतापर्यंत निरनिराळे संत आणि त्यांची मांदियाळी आपल्याला या मालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळाली असून मालिका आता एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे.

‘ज्ञानेश्वर माऊली’ मालिकेचे ५०० भाग पूर्ण होत आहेत. रविवारी ९ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वा. मालिकेचा महाएपिसोड सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. माऊलींचे चमत्कार आपल्याला यापुढेही पाहायला मिळतील. आता माऊलींच्या कार्यात ग्रामजोशी पुन्हा अडथळा निर्माण करताना दिसणार आहेत. त्यांना माऊली आणि त्यांची भावंडे कशाप्रकारे सामोरे जाणार, हे पाहायला मिळणार आहे.

दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर निर्मित ही मालिका गेले अनेक महिने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन करते आहे. माऊलींचे चमत्कार, त्यांनी केलेले गीता पठण यातून प्रेक्षकांना ज्ञानेश्वरांबद्दलची माहिती मिळाली. मालिकेत दाखविलेली गोष्ट प्रेक्षकांना भावली आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या मनात मालिकेने स्थान निर्माण केले आहे.

नंदेश उमप संत सेना महाराजांच्या भूमिकेत

संत सेना महाराज यांची भूमिका नंदेश उमप साकारत आहे. नंदेश उमप हे संगीत क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या या वेशाची, पेहरावाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली. त्यांच्या या आध्यात्मिक भूमिकेसाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे. संत सेना महाराज आणि संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे यांची भेट कशी होते, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्कंठा वाढवणारे असेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -