Sunday, September 14, 2025

देवदत्त नागे बनले हनुमान...

देवदत्त नागे बनले हनुमान...
  • ऐकलंत का!: दीपक परब

हनुमान जयंतीचे औचित्य साधत बहुचर्चित ‘आदिपुरुष’ सिनेमातील हनुमानाचा फर्स्ट लुक आऊट करण्यात आला आहे. या सिनेमात मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हा हनुमानाच्या भूमिकेत आहे. देवदत्तने या सिनेमाचे पोस्टर शेअर करून लिहिले आहे की, ‘श्रीराम के भक्त और रामकथा के प्राण...जय पवनपुत्र श्री हनुमान...!’ या पोस्टरला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली असून आता प्रतीक्षा आहे सिनेमाची. ‘आदिपुरुष’ या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हिंदी सिनेसृष्टी गाजवण्यासाठी देवदत्त नागे सज्ज आहे. या आधी बॉलिवूडच्या ‘तान्हाजी’ या गाजलेल्या सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. देवदत्तने आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. त्यात ‘जय मल्हार’, ‘डॉक्टर डॉन’, ‘देवयानी’, ‘बाजीराव मस्तानी’ या मालिकांचा समावेश आहे. ‘जय मल्हार' या मालिकेमुळे तो घराघरांत पोहोचला आणि त्याच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे.

प्रभास, सैफ अली खान आणि कृती सेनन यांच्या ‘आदिपुरुष’ या सिनेमाची घोषणा झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पण तरीही एकीकडे या सिनेमाला विरोध होत असताना दुसरीकडे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या १६ जूनला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. मराठमोळ्या ओम राऊतने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Comments
Add Comment