
राहुल गांधींच्या ट्विटला हिमंता बिस्वा यांचे जोरदार प्रत्त्युत्तर
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसापासून अदानी समुहाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहेत. त्यांनी शनिवारी एक शब्दकोडे असलेला फोटो ट्विट केला आहे. यावरुन राहुल गांधी यांनी गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंधिया, किरण कुमार रेड्डी, हिमंता बिस्वा सरमा आणि अनिल अँटनी यांच्यावर अदानी यांच्यावर निशाणा साधला. यावर आता आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे.
राहुल गांधींचे ट्विट रि-ट्विट करत हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रत्यारोप केला. "आम्ही तुम्हाला कधीही विचारले नाही की तुम्ही बोफोर्स आणि नॅशनल हेराल्ड घोटाळ्यांची कमाई कुठे लपवली. आणि तुम्ही किती वेळा ओटावियो क्वात्रोचीला भारतीय म्हटले. "आम्हाला परवानगी दिली. आता आपण कोर्टातच भेटू.", असे मुख्यमंत्री बिस्वा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
It was our decency to have never asked you, on where have you concealed the proceeds of crime from the Bofors and National Herald Scams.
And how you allowed Ottavio
Quattrocchi to escape the clutches of Indian justice multiple times .
Any way we will meet in the Court of Law https://t.co/a9RGErUN1A
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) April 8, 2023
ओटावियो क्वात्रोची हे इटलीचे प्रसिद्ध उद्योगपती होते. ज्यांच्यावर राजीव गांधी सरकारच्या काळात बोफोर्स घोटाळ्यात दलालीच्या माध्यमातून लाच घेतल्याचा आरोप केला होता. २८ एप्रिल २००९ रोजी सीबीआयने क्वात्रोचीला क्लीन चिट दिली आणि इंटरपोलला त्यांच्यावर जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेण्याचे आवाहन केले. सीबीआयच्या आवाहनावर इंटरपोलने क्वात्रोचीवरील रेड कॉर्नर हटवला. क्वात्रोची यांना क्लीन चिट देण्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. १३ जुलै २०१३ रोजी, वयाच्या ७४ व्या वर्षी, ओटावियो क्वात्रोची यांचे इटलीतील मिलान येथे स्ट्रोकमुळे निधन झाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सकाळी एक शब्दकोडे ट्विट केले, यामध्ये अदानी व्यतिरिक्त इतर अनेक नावेही अक्षरात लिहिली होती. ज्यामध्ये गुलाम नबी आझाद, सिंधिया, किरण कुमार रेड्डी, हिमंता बिस्वा सरमा आणि अनिल अँटोनी यांची नावे दिसत आहेत. यासोबतच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'तो सत्य लपवतो, त्यामुळेच तो दररोज दिशाभूल करतो. प्रश्न एकच आहे - अदानींच्या कंपन्यांमध्ये २०,००० कोटी बेनामी पैसा कोणाचा आहे?', असे ट्विटमध्ये म्हटले आहेत.