मुंबई : दुबईहून शुक्रवारी पहाटे तीन दहशतवादी मुंबईत आले असल्याचा फोन मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तिघांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
राजा ठोंगे नावाच्या एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन करून ही माहिती दिली. त्याने यापैकी एका व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबरही पोलिसांना दिला आहे.
या तिघांचाही बेकायदेशीर व्यवसाय असल्याची माहिती राजा यांनी दिली आहे. यापैकी एकाचे नाव मुजीब सय्यद असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या आधारावर पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.