Saturday, May 10, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

'गल्लन मिठियां' या पंजाबी गाण्याने लावले सर्वांना वेड

'गल्लन मिठियां' या पंजाबी गाण्याने लावले सर्वांना वेड

मुंबई : आजकालच्या तरुणाईला पंजाबी संगीत आणि पंजाबी गाण्यांनी वेड लावले आहे. पंजाबी गाणी संगितप्रेमींना खूप आवडतात. त्यातच 'गल्लन मिठियां' हे नवीन पंजाबी संगितप्रेमींनी अक्षरश: डोक्यावर घेतले आहे.


'गल्लन मिठियां' हे गाणे फेब्रुवारीच्या अखेरीस रिलीज झाले आणि अवघ्या महिनाभरातच या गाण्याला यूट्यूबवर तब्बल १ कोटी २९ लाख ९२ हजार ५३३ व्ह्यूज मिळाली आहेत. तर ६२ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.


पंजाबी गाणे 'गलन मिठियां' हे "मीत" च्या मधुर आवाजात गायले आहे. या ट्रॅकद्वारे तुम्ही बिनशर्त प्रेमाची अनुभूती घेऊ शकाल. या म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन अत्यंत प्रतिभावान दिग्दर्शक "सोनी सिंग" यांनी केले आहे.


गाण्यातील कुलू मनालीचे नैसर्गिक सौंदर्य तुमचे हृदय पिळवटून टाकेल. या गाण्यात एक परिपूर्ण प्रेमकथा लिहिली असून संगीतामध्ये ताजेपणा पाहायला मिळतो. कुलू-मनाली हे नेहमीच रसिकांच्या पसंतीस उतरले आहे. आणि हे गाणे कुलू-मनालीच्या सुंदर खोऱ्यात जादुई धून सादर करते.



येथे पहा व्हिडिओ -


Comments
Add Comment