Monday, July 15, 2024
Homeक्रीडाIPL 2024राजस्थानच्या गोलंदाजांना रोखण्याचे दिल्लीपुढे आव्हान

राजस्थानच्या गोलंदाजांना रोखण्याचे दिल्लीपुढे आव्हान

पहिल्या विजयासाठी कॅपिटल्स उतरणार मैदानात

  • राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स
  • वेळ – दुपारी ३:३०
  • ठिकाण – बारसापारा स्टेडियम, गुवाहाटी

गुवाहाटी (वृत्तसंस्था) : आयपीएलमधील शनिवारच्या डबल हेडर धमाक्यातील पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियममध्ये होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने त्यांचे पहिले दोन्ही सामने गमावले आहेत आणि ते त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. तर राजस्थान रॉयल्सने दोन सामन्यांमधून, एक सामना जिंकला आणि एक हरला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत, डेव्हिड वॉर्नर संघाची धुरा सांभाळत आहे. फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल २०२३ मध्ये विजयाचे खाते उघडायचे असेल, तर त्यांना शनिवारी रॉयल्सविरुद्ध फलंदाजीत सुधारणा करून सामना जिंकावाच लागेल. कारण पहिल्या दोन सामन्यांत मार्क वुड आणि अल्झारी जोसेफसारख्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांना जेरीस आणले होते होते. पृथ्वी शॉ आणि सर्फराज खानसारख्या प्रतिभावान फलंदाजांचा आत्मविश्वास डळमळीत दिसत आहे. अशा परिस्थितीत ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ आणि जेसन होल्डरसारख्या गोलंदाजांचा सामना करणे त्यांना सोपे जाणार नाही. याशिवाय राजस्थानकडे रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहलसारखे फिरकी गोलंदाज आहेत. जे अनुकूल परिस्थितीतही विरोधी संघाला अडचणीत आणू शकतात. अनुभवी भारतीय फलंदाजांची कमतरता ही संघाची सर्वात कमकुवत बाजू आहे. फलंदाज म्हणून दिल्लीकडे यश धुल, रिपल पटेल आणि ललित यादव यांच्या रूपात नवीन पर्याय आहेत.

दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने पहिला सामना जिंकला होता; परंतु दुसऱ्या सामन्यात त्यांना पंजाब किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघाचा फार्म बघता आजच्या सामन्यात राजस्थान रॉयलचे वर्चस्व दिसते. परंतु राजस्थानचा आक्रमक सलामीवीर जोस बटलरचे या सामन्यात खेळणे साशंक आहे. गत सामन्यात झेल घेताना बटलरला दुखापत झाली होती. बटलर खेळू शकला नाही, तर पहिल्यांदाच आायपीएलमध्ये खेळत असलेल्या जो रूटला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. ते दिल्लीच्या एनरिक नॉर्किया, खलील अहमद आणि कुलदीप यादव यांसारख्या गोलंदाजांना आव्हान देऊ शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -