Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वरिक्षा, टॅक्सी चालकांसह गृहिणींना महागाईत मोठा दिलासा

रिक्षा, टॅक्सी चालकांसह गृहिणींना महागाईत मोठा दिलासा

सीएनजी ८ रुपये तर पीएनजीच्या दरात ५ रुपयांची कपात

मुंबई : महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने सीएनजी गॅसचा दर निश्चित केल्यानंतर महानगर गॅस लिमिटेडने काही तासांतच सीएनजीच्या दरात प्रतिकिलो ८ रुपयांची कपात करण्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय, स्वयंपाकांसाठी वापरण्यात येणारा पीएनजी गॅसच्या दरात ५ रुपये प्रति एससीएमची (स्टॅंडर्ड क्युबिक मीटर) कपात करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून, ८ एप्रिलपासून हे नवे दर लागू होणार आहेत.

केंद्र सरकारने गॅस दराबाबत पारेख समितीच्या शिफारसी स्विकारल्यानंतर ही दर कपात लागू झाली आहे. मुंबई आणि जवळील परिसरात महानगर गॅस लिमिटेड ही कंपनी प्रमुख सीएनजी, पीएनजी गॅस वितरक आहे. त्यामुळे सीएनजी गॅसच्या दर कपातीचा मोठा फायदा कार चालकांपासून ते रिक्षा चालकांनादेखील होणार आहे. सीएनजीच्या दरवाढीमुळे अनेकांचे बजेट बिघडले होते. या दरकपातीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

८ एप्रिलपासून महानगर गॅस लिमिटेडकडून वितरीत होणाऱ्या सीएनजीचा दर प्रति किलो ७९ रुपये असणार आहे. तर, पीएनजीचा दर ४९ रुपये प्रति एससीएम इतके असणार आहे. पेट्रोलच्या तुलनेत ४९ टक्के आणि डिझेलच्या तुलनेत १६ टक्के सीएनजी स्वस्त असल्याचे महानगर गॅसने म्हटले आहे. तर, एलपीजीच्या तुलनेत पीएनजीचा दर हा २१ टक्क्यांनी स्वस्त आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -