
मुंबई : मुंबईतील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सुरक्षित प्रवासासाठी फायदेशीर ठरणारी रात्री १२ ते पहाटे ४ पर्यंतची बेस्ट बस सेवा आता बंद करण्यात येणार आहे.
गेल्या काही काळात बसेसची घटलेली संख्या आणि प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबईत रेल्वेनंतर बेस्टमध्ये सर्वाधिक गर्दी असते. बेस्टला मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन म्हटले जाते. रात्री उशिरा टॅक्सी, रिक्षाचालकांकडून मुजोरी आणि मनमानी केली जाते. तसेच भरमसाठ भाडेही आकारले जातात. त्यामुळे तीन शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही बेस्ट सेवा अत्यंत उपयुक्त ठरत होती. तसेच रात्री फिरणाऱ्या पर्यटकांनाही ही सेवा सोयीची ठरायची. परंतु आता ही सेवा बंद झाल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.