Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

'अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ' मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी

'अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ' मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी

नाशिक: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या रविवारी अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिकहून तब्बल १२०० शिवसैनिक विशेष रेल्वेने १८ बोगीतून आयोध्येत दाखल होणार आहेत. तसेच नाशिकमधून यंदाही स्वतंत्र रेल्वेगाडी करण्यात आली असून त्याद्वारे शिवसेनेचे आणखी तीन हजार कार्यकतें महाआरतीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती आहे. याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यासाठी खास टीशर्ट्स बनविण्यात आले आहे. रेल्वे बोगीवर लावण्यासाठी स्टिकर्स तयार करण्यात आले असून त्याचे वाटप सुरू झाले आहे. तालुका आणि विधानसभा मतदारसंघ निहाय कार्यकर्त्यांसाठी बोगी आरक्षित करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि शिवसेना हिंदुत्वाच्या भूमिकेवर आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ' या बॅनरखाली अयोध्या दौऱ्याचा प्रचार सुरू केला आहे.

या अयोध्या दौऱ्याची धुरा नाशिकच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरच सोपविण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या दौऱ्याची पूर्वतयारी एकेकाळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे यशस्वी नियोजन करणाऱ्या पण आता मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शिवसेनेचेसंपर्कनेते भाऊसाहेब चौधरी, सचिव नरेश म्हस्के यांच्यासह जिल्हाप्रमुख अजय बोरस्तेंचे पथक अयोध्येत दाखल झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा