मालाड-मढ येथील अनधिकृत स्टुडिओवर निष्कासनाची कारवाई
मुंबई : मालाड पश्चिम मढ येथे माजी मंत्री अस्लम शेख व आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने ४९ बेकायदा स्टुडिओ असल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर पी उत्तर विभागाने या ठिकाणी जाऊन पाहणी केली होती. या पाहणीत सीआरझेडचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. त्यानंतर बेकायदा स्टुडिओना नोटीस बजावण्यात आली होती. राष्ट्रीय हरित लवादानेही मढ येथील ५ बेकायदा स्टुडिओवर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या निष्कासन पथकाकडून मढ येथील अनधिकृत स्टुडिओ जमीनदोस्त करण्याच्या कारवाईला सुरूवात झाली आहे.
मढ मालाड येथील अनधिकृत स्टुडिओंवर आज सकाळी हतोडा !
असलम शेख, आदित्य ठाकरे, ठाकरे सरकारचा आशीर्वादाने 2021 मधे डझन भर अनधिकृत स्टुडिओ बांधण्यात आले
आज पासून तोडण्याचे काम सुरू
मी देखील 11 वाजता visit करणार @BJP4India @mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/bkfLmiC4Qv
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 7, 2023
पालिकेच्या नोटिसीनंतर मिलेनियम सिटी भाटिया बॉलिवूड व एक्सपेशन यांनी स्टुडिओ स्वतःहून जमीनदोस्त केला. मात्र काही स्टुडिओ मालकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र उच्च न्यायालयाने दिलासा देत कारवाईला स्थगिती दिली होती. मात्र हरित लवादाने कारवाई करण्याचे निर्देश गुरुवारी दिले. त्यामुळे आज शुक्रवारी सकाळीच बेकायदा ५ स्टुडिओ जमीनदोस्त करण्यासाठी पोलीस बंदोबस्तासह महापालिकेचे निष्कासन पथक या अवैध बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करत असल्याचे पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.