गुरू तेथे ज्ञान

  391


  • जीवन संगीत: सद्गुरू वामनराव पै


जीवनसंगीताचे सात सूर म्हणजे पहिला जग, दुसरा कुटुंब, तिसरा शरीर, चौथा इंद्रिये, पाचवा बहिर्मन, सहावा अंतर्मन, सातवा परमेवर असे आहेत. या जीवनसंगीतातील एक स्वर जरी बिघडला, तरी सगळे बिघडते हे प्रथम लक्षात घ्यायचे. तुम्ही म्हणाल, यातला कुठला स्वर जास्त महत्त्वाचा? तर यातला प्रत्येक स्वर अत्यंत महत्त्वाचा. जग महत्त्वाचे आहे तितकेच कुटुंब महत्त्वाचे आहे. शरीर महत्त्वाचे आहे, तितकीच इंद्रिये महत्त्वाचीआहेत. मन महत्वाचे आहे, तितकाच परमेश्वर महत्त्वाचाआहे. यातला कुठलाही एक स्वर बिघडला तरी संसार नकोसा होतो. संगीतातला एक सूर बेसूर झाला तरी सगळे संगीत बिघडते. पुष्कळ लोकांना असे वाटते की, परमार्थ केला की, सगळे व्यवस्थित होईल. वयासाठी ते बुवाबाबांकडे वळतात, कारण त्यांच्या मते हे तथाकथित बुवा- बाबा काही करत नाहीत तरी त्यांचे व्यवस्थित चाललेले दिसते.


उद्योगधंदा करत नाहीत तरी त्यांचे जसे चालते तसे आपणही हेच केले की, आपलेही तसेच होईल. असा चुकीचा समज करून घेतात व हे लोक बुवाबाबांकडे धावतात, पण प्रत्यक्षात जीवन व्यवस्थित जगण्यासाठी आवश्यक उपदे ते देतात की नाही, हे बघत नाहीत. कोणी एकाने हातचलाखीचे चमत्कार केले की हाच सत्पुरुष, असे यांना वाटू लागते व लोक त्याच्या पाठी धावू लागतात. लोक धावतात, तेव्हा असा विचार करत नाहीत की, हा माणूस आपल्याला ज्ञान देतो की नाही? ज्ञानाच्या नावाखाली अज्ञान देतो का? हाही प्रश्नच आहे. पुष्कळ वेळेला बुवाबाबा ज्ञानाच्या नावाखाली अज्ञानच देत असतात, अंधश्रद्धा अधिकच वाढवत असतात.


खरे जे ज्ञान आहे, ते आपल्याला कळतच नाही. खरे दूध व पिठाचे दूध वेगळे आहे हे अवस्थाम्याला कधी कळले? तो जे दूध इतके दिवस पीत होता, ते खरे दूधच नव्हते, पण जेव्हा कौरवांकडे तो दूध प्यायला तेव्हा खरे दूध व हे दूध वेगळे आहे, हे त्याला कळले. खरे जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत खोटे चालते. खरे ज्ञान मिळणे दुर्मीळ झालेले आहे. ते मिळण्यासाठी पात्रता असावी लागते. ते मिळण्याची इच्छा असावी लागते. ते मिळण्यासाठी पाठी पुण्याई असावी लागते. सांगायचा मुद्दा, “गुरू तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्न” असे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले आहे. गुरू आहे तेथे ज्ञान असलेच पाहिजे. कारण, ज्ञान हाच खरा देव आहे.

Comments
Add Comment

Vastu Tips : तुमच्या घरातही या पाच चुका होतात का? वास्तुशास्त्रानुसार लगेच बदला, नाहीतर घरात येईल दरिद्रता!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप

Success Tips: पैसा टिकवून ठेवायचा आहे? 'या' ५ चांगल्या सवयी तुम्हाला बनवतील श्रीमंत!

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या 'चाणक्य नीती'मध्ये केवळ राजकारण आणि समाजकारणच नव्हे, तर पैसा कमावण्याचे आणि

सोनपावलांनी घरा, गौराई येई माहेरा !

मनाचा गाभारा - अर्चना सरोदे आज माझ्या उंबरठ्यात उभी गौर सवाशीण चला लिंबलोण करू, आली माहेरवाशीण ओलांडूनी उंबरठा

गणेशोत्सव श्रद्धा ते सजगता

ऋतुराज - ऋतुजा केळकर गणपती बाप्पा म्हणजे केवळ एक देव नव्हे, तर आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. तो सकाळच्या मंद

महर्षी विश्वामित्र

भारतीय ऋषी - डॉ. अनुराधा कुलकर्णी ॐ भूर्भुवःसः । तत्सवितुर्वरेण्यं । भर्गो देवस्य धीमहि । धियो यो नः प्रचोदयात्

शुद्ध भाव

जीवन संगीत - सद्गुरू वामनराव पै देवावर प्रेम करायला शिकले पाहिजे. देवावर प्रेम तेव्हाच करता येईल जेव्हा जेव्हा