Wednesday, July 17, 2024
Homeमहत्वाची बातमीसुषमा अंधारे व राखी सावंत दोघी बहिणी!

सुषमा अंधारे व राखी सावंत दोघी बहिणी!

मोहित कंबोज यांचे ट्वीट चर्चेत

मुंबई : ठाकरे गटाच्या महिला उपनेत्या सुषमा अंधारे यांची राखी सावंतशी तुलना करणारे वादग्रस्त ट्वीट भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

भाजपा नेते मोहित कंबोज सातत्याने आपल्या ट्वीटमुळे आणि विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या या ट्वीटमुळे आता वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये राखी सावंत आणि सुषमा अंधारे या बहिणी असल्याची टीका केली आहे. तसेच दोघीही एकमेकींच्या स्पर्धक असल्याचेही मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

मोहित कंबोज यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “सुषमा अंधारे और राखी सावंत दोनों बहन हैं … एक बहन महाराष्ट्र की राजनीति में और दूसरी बहन महाराष्ट्र सिनेमा में ….. दोनों एक दूसरे की प्रतियोगी भी हैं की रोज़ ज़्यादा… सनसनी कौन मचाई गा !” त्यांच्या अशा आशयाच्या ट्वीटमुळे आता आणखी एका नव्या वादाला सुरूवात झाली आहे. ज्याप्रमाणे नेहमी राखी सावंत ही कोणत्या ना कोणत्या कारणावरून रोज सनसनी निर्माण करत असते, त्याचप्रमाणे सुषमा अंधारे या देखील तिची बरोबरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या दोघींमध्ये दररोज खळबळजनक वक्तव्य कोण करेल यासाठी स्पर्धा सुरू असते, असे मोहित कंबोज यांच्याकडून त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिण्यात आले आहे.

ठाकरे गट आणि भाजपमध्ये फडतूस आणि काडतूस या शब्दावरून कलगीतुरा रंगला आहे. या मुद्द्यावरून सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. ज्यामुळे भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त ट्वीट केले असल्याचे बोलले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -