नोकरीची संधी! सीआरपीएफमध्ये मेगा भरती!

तब्बल १ लाख ३० हजार कॉन्स्टेबलची पदे भरणार


नवी दिल्ली : देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारी रिक्त जागा भरण्याचे आदेश सरकारने अनेक विभागांना दिले आहेत. त्यानुसार सीआरपीएफच्या कॉन्स्टेबलच्या तब्बल १ लाख ३० हजार जागा भरण्याचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २३ वर्षे ठेवण्यात आली आहे.


केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, एकूण १ लाख २९ हजार ९२९ पदांची भरती केली जाणार असून त्यापैकी १ लाख २५ हजार २६२ पदे पुरुष उमेदवारांसाठी आहेत आणि ४ हजार ४६७ पदे महिला उमेदवारांसाठी आहेत. कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी, १० टक्के रिक्त जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव असणार आहेत.





या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. माजी लष्करी कर्मचार्‍यांच्या बाबतीत समतुल्य आर्मी पात्रता असणे आवश्यक आहे.


उमेदवारांची निवड ही शारीरिक कार्यक्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.


प्रोबेशन कालावधी हा दोन वर्षांचा आहे. २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० अशी या पदाची वेतनश्रेणी आहे. अर्ज प्रक्रियेच्या तारखा अद्याप अधिकृत नोटीसमध्ये जाहीर करण्यात आली नाही. मात्र, लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Karnataka teachers suspended : RSS च्या पथसंचालनात सहभाग घेणं पडलं महाग! कर्नाटकातील २ सरकारी शिक्षकांवर निलंबनाची मोठी कारवाई

कर्नाटक : कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यात शिक्षण विभागाने दोन सरकारी शिक्षकांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली

Raksha Bandhan : राष्ट्रपतींसह अन्य नेत्यांनी देशवासीयांना रक्षाबंधन सणाच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह

PMJDY :'प्रधानमंत्री जन धन योजने'ला 12 वर्षे पूर्ण, 59.09 कोटी खाती उघडली, 3.17 लाख कोटी रुपये जमा

56% खातेधारक महिला आहेत तर 78% खाती ग्रामीण व निम-शहरी भागांमधील आहेत देशभरात डिजिटल पेमेंट आणि आर्थिक

USA Murder Case : अमेरिकेत प्रेयसीची हत्या केली, भारतात ठिकाना लावला...अन् आरोपीला आग्र्यातून अटक!

अमेरिकेत आपल्या प्रेयसीची भयंकर हत्या करून भारतात पळून आलेल्या एका आरोपीला आग्रा येथून पोलिसांनी अटक केली आहे.

Udhampur Accident: धमपूरमध्ये टँकरची डंपरला जोरदार धडक लागताच लागली भीषण आग; महामार्गावर थरकाप उडवणारी परिस्थिती

उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा तेल टँकर आणि

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास