

वादग्रस्त नर्तिका गौतमी पाटील सर्व प्रथम चर्चेत आली ती षण्मुखानंद येथे झालेल्या लावणीच्या कार्यक्रमामुळे. तिला अश्लील ठरवत त्यावेळी लावणीसम्राज्ञी सुरेखा पूणेकर यांच्यासह मेघा घाडगे हिनेही तिच्या नृत्यावर टीका केली होती.

मात्र, तरुणाई तिच्यावर फिदा आहे. तिला अनेक कार्यक्रमांच्या सुपाऱ्या नाकाराव्या लागतात इतकी तिच्याकडे गर्दी असल्याची चर्चा आहेेे.

गौतमी पाटील हिने मेधा घाडगे हिची माफीही मागीतली होती पण तिचं तिच्या शैलीतील नृत्य ती अजूनही त्याच फटकेबाजीत करते.

काल पंढरपूर येथेही गौतमीच्या नृत्यादरम्यान गोंधळ झाला. हा गोंधळ इतका होता की पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

गौतमी अनेक महिला संघटनांच्या रडारवर आहे तरीही ती बिनधास्तपणे सर्वांसमोर तिचे नृत्य सादर करते.

गौतमीचा बॉयफ्रेंड कोण? याबाबतही समाजमाध्यमे, इंटरनेटवर चर्चा सुरु असते. तिच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी तरुण उत्सूक असतात.

समाजमाध्यमांवर सतत व्हायरल होणाऱ्या गौतमीला अगदी चिमुकल्यांच्या बर्थडे पासून ते नेत्यांच्या कार्यक्रमाच्या सुपाऱ्या असतात.

इंदूरीकर महाराज यांनी गौतमी पाटील हिला ३ लाख आणि मला ५ हजार वरुन हिला संरक्षण अशा आशयाचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं

गौतमी असं म्हणते तिने ५०० रुपयांपासून सुपारीची सुरुवात केलेली. त्यानंतर ती हजारभर मानधन घेत होती.

आता ती तब्बल दीड ते दोन लाख मानधन घेत असल्याची चर्चा आहे.

सहकलाकारांचे पैसे देऊन ती महिन्याला ३० ते ३५ लाख रुपये कमवत असल्याचा दावा इंटरनेटवर काही वेबसाईट्सनी केला आहे. (फोटो क्रेडिट - गुगल)