Sunday, July 14, 2024
Homeक्रीडादिल्लीच्या सामन्यात उर्वशीबाबत वादग्रस्त पोस्टर, उर्वशीने प्रतक्रिया देत म्हटले....

दिल्लीच्या सामन्यात उर्वशीबाबत वादग्रस्त पोस्टर, उर्वशीने प्रतक्रिया देत म्हटले….

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात मंगळवारी सामना झाला. या सामन्यादरम्यान चाहत्याच्या एका पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘थँक्स गॉड… उर्वशी सामना पाहायला आली नाही’ असा मेसेज असलेला पोस्टर चाहता घेऊन स्टेडियमवर पोहचला होता. हे पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. याचा स्क्रीनशॉट घेऊन आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत, असे का? असा प्रश्न उर्विशीने विचारला आहे. उर्वशीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर मंगळवारी गुजरातने दिल्लीचा पराभव केला. या सामन्यात संघाचे मनोबल उंचावण्यासाठी ऋषभ पंतने स्टेडियममध्ये हजेरी लावली. कार अपघातात जखमी झालेला पंत अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला तो मुकला आहे. तो पुढील सात ते आठ महिने मैदानावर पुनरागमन करू शकत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -