Friday, October 24, 2025
Happy Diwali

उद्धव ठाकरे म्हणाले, एक दाखवा; शीतल म्हात्रेंनी दिली चार उदाहरणे

उद्धव ठाकरे म्हणाले, एक दाखवा; शीतल म्हात्रेंनी दिली चार उदाहरणे

मुंबई : ठाण्यातील पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी हिंदुत्व सोडले याचे एक उदाहरण दाखवा, मी घरी बसेन, असे आव्हान दिले होते. यावर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत केवळ १ नव्हे तर तब्बल ४ उदाहरण दिली आहेत.

छत्रपती संभाजीनगर नामांतरास विरोध... मुंबई बॉम्बस्फोट आरोपींना मदत करणार्‍या नवाब मलिक यांच्यासंदर्भात घेतलेली बोटचेपी भूमिका... भोंग्यांसंदर्भात घेतलेली मवाळ भूमिका... सावरकरांचा अपमान केला त्याच्या पक्षासोबत अजून ही आहात, असे ट्विट करत शीतल म्हात्रे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

सध्या हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.

Comments
Add Comment