
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीचे काय आहे 'हे' प्रकरण
कोल्हापूर : प्रशासनाकडून दुर्लक्ष केले गेल्याने आता न्यायालयाने नुकसान भरपाईपोटी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयावरच जप्तीचे आदेश काढले आहेत. हा खटला १९८४ पासून चालू होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी, की, कुरुंदवाड मधील विकास आराखड्यासाठी घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठीचा वाद न्यायालयात सुरू होता. यामध्ये कुरुंदवाड मधील वसंत संकपाळ यांची रस्त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जमीन घेतली होती. जमिनीच्या बदल्यात कुठलाही मोबदला न दिल्याने १९८४ पासून खटला चालू होता.
प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या न्यायालयाने नुकसान भरपाई म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील खुर्च्या, लॅपटॉप, गाडी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायालयाने केलेल्या आदेशानूसार खुर्च्या, लॅपटॉप, वाहन जप्त करण्याच्या कार्यवाहीसाठी अधिकारी व वकील देवराज मगदूम जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत.