१४ विरोधी पक्षांना दणका
नवी दिल्ली : ईडी आणि सीबीआय विरोधात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील १४ विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय)आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सारख्या केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करणाऱ्या १४ राजकीय पक्षांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
#BREAKING Supreme Court refuses to entertain plea by 14 political parties alleging that Central government led by BJP is misusing central agencies like CBI and ED. #SupremeCourt says it CANNOT lay down guidelines in abstract without factual context with a case@CBIHeadquarters…
— Bar & Bench (@barandbench) April 5, 2023
सीबीआय आणि ईडी सारख्या केंद्रीय तपास संस्थांचा “मनमानी वापर” होत असल्याचा आरोप करत विरोधी नेत्यांच्या विरोधात अटक, रिमांड आणि जामीन नियंत्रित करणारी मार्गदर्शक तत्वांमध्ये बदलाची मागणी या याचिकेत केली होती.