
नवी दिल्ली: इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या हंगामातून बाहेर झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरच्या जागी केकेआरने जेसन रॉयची निवड केली आहे. सध्या युवा खेळाडू नितीश राणा संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. जेसन रॉयसाठी केकेआरने २.८ कोटी रूपये मोजले आहेत. खरं तर रॉयची मूळ किंमत भारतीय रकमेनुसार १.५ कोटी रूपये एवढी होती.
🚨 NEWS 🚨@KKRiders sign Jason Roy.
Details 🔽 #TATAIPLhttps://t.co/ITiAoWl6R2
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2023
दरम्यान, केकेआरचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने देखील चालू हंगामातून माघार घेतली आहे. अय्यरच्या जागी जेसन रॉयला संघात घेतल्याने केकेआरची ताकद वाढली आहे. रॉय २०२१ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये खेळला होता.
सनरायझर्स हैदराबादकडून ५ सामन्यांमध्ये रॉयने १५० धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका अर्धशतकी खेळीचा समावेश आहे. या ३२ वर्षीय फलंदाजाने ६४, २०-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून १३१.६१ च्या स्ट्राईक रेटने १ हजार ५२२ धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नावावर ८ अर्धशतकांची नोंद आहे.