भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या यात्रेत हजारोंच्या संख्येने सावरकर प्रेमी झाले सहभागी
कणकवली : कणकवली पटकी देवी मंदिर येथून “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला” आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सुरूवात झाली. या यात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने सावरकर प्रेमी सहभागी झाले. तर रत्नागिरी येथील शिवरूद्र ढोल पथकाने शानदार सलामी दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन चरित्रातील देखावे या यात्रेत दाखण्यात आले. यावेळी जय श्रीराम, मी सावरकर अशा जोरदार घोषणा दिल्या. मी सावरकर लिहीलेल्या टोप्या, शाली प्रत्येकाने घातल्या होत्या. त्यामुळे भगवे वातावरण निर्माण झाले होते.
या सावरकर गौरव यात्रेत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, सरचिटणीस प्रभाकर सावंत, प्रमोद रावराणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, शिवसेना तालुका प्रमुख भूषण परुळेकर, भाजपा तालुकध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, राजश्री धुमाळे, मनोज रावराणे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, सुरेश सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, भालचंद्र साठे, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, तालुका सरचिटणीस महेश गुरव, बँक संचालक विठ्ठल देसाई, वैभववाडी नगराध्यक्ष स्नेहा माईनकर, तालुकाध्यक्ष नासीर काझी, राजन चिके, संजना सदडेकर, मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, हर्षदा वाळके, बाळ खडपे, संदीप साटम, प्राची तावडे, देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, डॉ. अमोल तेली, योगेश चांदोस्कर, रवी पाळेकर, प्रणाली माने आदीसह भाजपा व शिवसेना पक्षाचे कणकवली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.