- सेवाव्रती: शिबानी जोशी
ईशान्य भारताचा पूर्वोत्तर भाग निसर्गसौंदर्य आणि खनिज संपत्तीने समृध्द असा आहे. पूर्वांचल म्हणजे आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश ही सात राज्ये येतात. पूर्वांचल हा ७० कि.मी. लांबीच्या चिंचोळ्या पट्टीने उर्वरित भारताशी जोडला गेला आहे. पूर्वांचलमध्ये सांस्कृतिक विविधता आहे. जवळजवळ ४०० बोलीभाषा आहेत. त्यामुळे या लोकांच्या एकत्रीकरणाचे आव्हान आहे, तसच लांब असल्यामुळेही दुर्लक्षित राहिला आहे. गेली अनेक वर्षे पूर्वांचलमध्ये फुटीरतेचे विष पसरवल जात होत.
त्यामुळे या प्रदेशातील जनतेला राष्ट्रीय प्रवाहात आणणे, भारतीय म्हणून त्यांच्यात विश्वासाचं नातं निर्माण करणं ही आजची गरज आहे. पण अतिरेकी संघटनांशी लढणे म्हणजे आपण हातात हत्यार घेणे नव्हे, तर आपण सेवेच्या माध्यमातून पूर्वांचलातील जनतेला प्रेम देणे आहे असा विचार करून रा. स्व. संघाने सेवाकार्याच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य आणि रोजगारनिर्मितीच्या क्षेत्रात तिथे काम सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात पूर्वांचलमधील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले गेली. संघ कार्यकर्त्यांनी आपल्या परिश्रमाने पूर्वांचल आणि उर्वरित भारत यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा सेतू बांधन्याचा प्रयत्न सुरू केला . महाराष्ट्र प्रांतातील स्वयंसेवकानी या तीन राज्यांतील विद्यार्थी व विद्यार्थिनीना आणून महाराष्ट्रात १२ ठिकाणी वसतिगृहे सुरू केली आहेत.
१९९३ साली यातील एक वसतिगृह संभाजीनगरला सुरू झाले होत परंतु ते भाड्याच्या जागेत चालवलं जात होत. त्या ठिकाणी खासी मुलांची सोय करण्यात आली होती.संघ कार्यकर्ते असलेले ओक पती पत्नी मेघालयात जाणार होते म्हणून तोपर्यंत ती वास्तू त्यांनी या खासी मुलांच्या वस्तीगृहासाठी दिली.
औरंगाबाद मधल्या ओक दांपत्याने सेवानिवृत्त झाल्यानंतर पूर्णवेळ समाजकार्य करण्याच निश्चित केलं होतं त्याशिवाय संघाशी निगडित कार्य ते करत होतेच त्यामुळे औरंगाबाद मधील संघ प्रचारक गिरीशजी कुबेर यांनी त्यांना मेघालय फिरून येण्याची विनंती केली त्यानुसार ओक दांपत्य समाजकार्याचा हेतू मनात धरूनच मेघालय इथे फिरायला गेले. तिथल्या समाजाचे प्रश्न , जीवन पद्धती त्यांनी जाणून घेतली. तिथल्या एका राष्ट्रीय विचाराच्या शाळेत शिक्षकांची कमतरता होती ,त्यामुळे दोघांनीही शिक्षक म्हणून कामही केल. जवळपास दोन वर्ष तिथे निवास व कार्य केले.तिथे असं लक्षात आलं की उर्वरित भारतापासून हा देश खूप लांब असल्यामुळे तिकडचे लोकांची नाळ उर्वरित भारताशी तुटल्यासारखी आहे. त्यांना उर्वरित भारतात आणून शिक्षण, राष्ट्रीय विचार दिले जाण्याची गरज आहे. शिक्षण, आरोग्य तसेच रोजगाराच्या संधी फार कमी आहेत तसेच ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांचं एक जाळ धर्मप्रसाराच्या हेतून तयार केल आहे. त्यामुले ओक दांपत्याने तिथल्या मुलांच्या पालकांशी संपर्क साधला, त्यांना शिक्षणाचं आणि देशभक्तीचे महत्त्व पटवून दिलं आणि दोन वर्ष तिथे काम करून ओक दांपत्य औरंगाबादला परतल. संभाजीनगर येथे अशा प्रकारचं काम भाड्याच्या जागेत सुरू होतच.या वस्तीगृहाला कायमची सोय व्हावी म्हणून त्यांनी आपला स्वतःचा बंगला रा स्व संघाच्या जनकल्याण समितीला देऊ केला. कार्यकर्त्यांनी जुनी वास्तू पाडून तिथे नव्याने वसतिगृहाची उभारणी करण्यात आली. त्याच ठिकाणी त्यांचे पालक म्हणून ओक दांपत्य कार्य करत आहे. या वसतिगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे 2012पासून इथे गारो पहाड मधील मुली यायला सुरुवात झाली. प्रथम सहा मुली आल्या.
नंतर हळूहळू त्या दरवर्षी दोन तीन दोन तीन करत वाढत गेल्या, सध्या पंधरा मुली आहेत. येथे केवळ मुलींची सोय करण्यात आली आहे. मेघालय हा प्रदेश खासी, जयंतीया आणि गारो या डोंगराळ भागात विभागला गेलेला आहे. अंदाजे 25 ते 30 मुलींची राहण्याची सोय इथे होऊ शकते.या मुलांना सुरुवातीला आपापल्या भाषा येत असतात. कारण प्रत्येक जनजातीची भाषा वेगवेगळी ,ती सर्वांना येईलच असे नाही. या मुलींची राहणं खाणं, शिक्षण तसंच सामाजिक रहाणी अशी सर्व जबाबदारी छात्रावास विनामूल्य स्वीकारत. हे सर्व समाजाच्या दातृत्वावर चालते. सरकारची कोणतीही मदत इथे घेतली जात नाही . ही मुले फारच मोकळ्या, स्वैर वातावरणात वाढलेली असल्यामुळे त्यांना कशाचेच बंधन नव्हते . त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरता समजावून सांगून शाळे व्यतिरिक्त शिकवणी घेत व त्यांचा अभ्यास पक्का करण्याचा प्रयत्न करीत. क्रांगतेण नावाचा विद्यार्थी शेवटपर्यंत नापास न होता पास झाला. या मुलांना शिक्षण देऊन या मुलांनी शिक्षण घेऊन पुन्हा आपल्या भागाचा विकास करण्याकरता परतावं असा हेतू या मुलांना येथे आणताना असतो त्यानुसार अनेक मुलं आजपर्यंत खूप चांगलं उच्च शिक्षण घेऊन आपल्या भूमिची सेवा करण्यासाठी परतली आहेत. सुरुवातीला बारा मुलांची एक तुकडी त्यानंतर बारा मुलांची दुसरी तुकडी संभाजी नगर इथल्या छात्रावासात आली होती.
प्रकल्पाची नुकतीच सुरुवात झालेली असल्यामुळे जमेल तसे विद्यार्थी पाठविले होते. त्यामुळे सुरुवातीला आलेली मुले वागणुकीत, अभ्यासात, राहण्या करण्यात कमी होती. दुसऱ्या खेपेला आलेली मुले निवडून आणलेली असल्यामुळे सगळीच हुशार होती. त्यांनी अभ्यासात खूप प्रगती केली. कोणतीच भाषा न येणारी ही मुले मराठी, इंग्रजी चांगले शिकले. सावरकरांचे जयोस्तुते, पसायदान याशिवाय इतर गाणी पण चांगली गात. काटक प्रकृती असलेली ही मुले फारशी आजारी पडत नाहीत.मुलीवर डॉक्टर वाकोडे सारखे डॉक्टर त्यांच्यावर विनामूल्य उपचार होतात. या सर्व मुलांचा आहार , दररोजच मुख्य खाद्य तांदूळ, बटाटे व मासे . मांसाहारी जेवण यांना जास्त प्रिय. सुरुवातीला छात्रावासात केवळ शाकाहारी भोजन मिळत असल्यामुळे ही मुलं नाराज दिसायची, हे लक्षात आल्यावर त्यांच्यासाठी पंधरा दिवसातून एकदा मांसाहार सुरू केला ते पाहून ती मुलं खूप आनंदली. परंतु नंतर स्थानिक लोकांच जेवण त्यांनी जेव्हा खाऊन पहिलं तेव्हा ते ही त्यांना आवडू लागल.सुरुवातीला काहीचआपलं न खाणारी ही मुले नंतर षडरस आवडीने खाऊ लागली. अगदी पुरणपोळीपासून ते लोणच्यापर्यंत, दिवाळीचे फराळाचे, इतर सणाचे पक्वान्नसुध्दा आता ते आवडीने खात आहेत. त्यांचे बिहू सारखे सणही आवर्जून साजरे केले जातात बिहुला ते खाणारे गोड पदार्थ बनवले जातात. प्रामाणिक आणि निरपेक्ष काम असलं की मदतीचे हात आपोआप येतात त्यानुसार अनेक प्रकारचे सहकार्य समाजाकडून छात्रावासाला मिळत. वा ळूजसारख्या औद्योगिक वसाहत असेल,दिलीप खंडेराय यांच्यासारखे शिक्षक असतील, त्यानी प्रकल्पाला मदत करण्याची इच्छा बोलून दाखविली. ते एक उत्तम नर्तक असून त्यांनी आम्हाला त्यांचा कार्यक्रम तिकीट लावून करावा व आलेले पैसे संस्थेला द्यावेत असे सुचविले. त्याद्वारे एक लाख रुपये जमा झाले. अशा हजारो देणगीदारांनी मदत केली म्हणून प्रकल्प सुरू राहिलय . मुलां,मध्ये वावरताना आणखी एक गोष्ट ओक पती-पत्नीच्या लक्षात आली की या मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त थोडे संस्कार करण्याची गरज आहे. त्यासाठी , राम रक्षा हनुमान चालीसा शिकवली.मराठी सण या मुली ना सोबत घेऊन काही महिला मंडळाचे ग्रुप येउन साजरे होतात. सणाची त्यांना माहिती सांगितल्यावर त्यांच्या लक्षात यायचे की ‘मराठी संस्कृती व मेघालयातील संस्कृती एकच आहे. येथे बायका तुळशीची, वडाची, आवळ्याच्या झाडाची पूजा करतात तर मेघालयात खुपदा वृक्षपूजन नदी पर्वत गाय नागाची पूजा होते ते निसर्गपूजक आहेत. त्यामुळे महाराष्ट्र मेघालय वेगळा नाही असे त्यांचे मत बनत गेले. एक वर्षी मेघालयात सुटीला गेलेल्या मुलांना मिशनरी लोकांनी विचारले की महाराष्ट्रात तुम्हाला शिक्षणाच्या नावाखाली घेऊन जाऊन तुम्हाला हिंदू करतात का ? तर ७वीच्या वर्गातील एका मुलाने सांगितले होत की, ‘Hindustan is a big umbrella under we all are Sitting. ओक सांगतात.
मुले चांगल्या मार्कांनी पास झाली की, त्यांचा निकाल लागला त्या दिवशी पेढे आणून देवाला नैवेद्य दाखवून मुलांना खायला द्यायचे अशी त्यांची पद्धत आहे. एकदा असेच पेढे घेऊन आलो तर त्यातला एक लगेच देवघरात गेला. त्याने देवापुढे पाण्याने चौकोन केला. व देवाला नैवेद्य दाखविला. आतापर्यंत या येथून ३५ मुल, मुली शिकून आपल्या घरी परतल्या आहेत आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. दरवर्षी साधारण १२ ते १५ मुली निवासाला असतात .ईशान्य भारतातील नागरिकांना उर्वरित देशाशी जोडून त्यांच्यामध्ये राष्ट्रीय विचार रुजवण्यासाठी इथे आणून त्यांची सर्व सोय करून आत्मनिर्भर बनवण्या साठी ओक दांपत्यासारखे अनेक मेघालय समितीचे कार्यकर्ते कार्य करत आहेत. मेघालयातील महिलांच्या विकासात, तसेच शाळेच बांधकाम कार्यालयाचे बांधकाम रोजगार हमी योजनेची काम अशा वेगवेगळ्या प्रकारात ओक पती-पत्नींचा वाटा आहे