Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीधाराशिवमध्ये राष्ट्रवादीचे १२ व ठाकरे गटाचे ३ नगरसेवक शिवसेनेत दाखल

धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचे १२ व ठाकरे गटाचे ३ नगरसेवक शिवसेनेत दाखल

कळंब : कळंब नगर परिषदेतील १२ नगरसेवकांनी आज तर उद्धव ठाकरे गटाच्या तीन नगरसेवकांनी काल धाराशिव येथे शिवसेनेत प्रवेश केल्याने या नगरपरिषदेवर पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनामुळे शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १२ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यात माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष आणि सभापतींचा देखील समावेश आहे. यामुळे कळंब तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून उबाठा गटातील तीन नगरसेवकांनी नुकतेच शिवसेनेत प्रवेश केल्याने कळंब नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व नगरसेवकांचे पक्षात स्वागत करताना आपले मनोगत मांडले. यात धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून जिल्हयात शिवसेना वाढवण्याचे काम सुरु आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक शिवसेनेत सामील होण्यासाठी येत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ नगरसेवक शिवसेनेत आले असून उबाठा गटाचे ३ नगरसेवक कालच शिवसेनेत दाखल झाले आहेत.

१७ पैकी १५ नगरसेवक आपल्याकडे आले आहेत. राज्यातील युती सरकार हे सर्वसामान्य नागरिकांना न्याय देणारे सरकार आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासून वेगाने निर्णय घेण्यात आले असून अनेक प्रलंबित विषय मार्गी लावण्यात आलेत. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात देखील त्याचीच झलक पहायला मिळाली असून या अर्थसंकल्पातून सर्व घटकांना न्याय देण्यात आला आहे.

कळंब तालुक्यातील या नगरसेवकानी आपल्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला असून, स्थानिक पातळीवरील विकासकामे करण्यासाठी पालकमंत्री सक्षम आहेत, तरीही यापुढे प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी अधिक निधी दिला जाईल, असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणारे नगरसेवक

माजी नगराध्यक्ष संजय मुंदडा, माजी नगराध्यक्षा सौ. सुवर्णा मुंडे, माजी नगराध्यक्ष सौ. आशा भवर, माजी उपनगराध्यक्ष सुभाष पवार, माजी उपनगराध्यक्ष सौ. इंदुमती हौसलमल, माजी उपनगराध्यक्ष साधना बागरेचा, माजी उपनगराध्यक्ष सौ. गीता पुरी, माजी उपनगराध्यक्ष सफुरा शकील काझी, माजी गटनेता लक्ष्मण कापसे, माजी नगरसेवक मुख्तार बागवान, माजी नगरसेवक निलेश होनराव यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा समावेश होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -