नवी दिल्ली : भारतात आयपीएलची स्पर्धा सुरु असतानाच भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
कोरोनाच्या भितीने अनेक खेळाडूंनी गेल्या वर्षी आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर आकाश चोप्रा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने खेळाडूंमध्ये घबराट परसली आहे.
“कोरोनाने पुन्हा माझ्यावर हल्ला केला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवली असल्याने मी काही दिवस समालोचन करताना दिसून येणार नाही. घसा खराब झाल्याने आवाजावर परिणाम होऊ शकतो”, अशा आशयाचे ट्वीट आकाश चोप्रा यांनी केले आहे. यामुळे पुढील काही दिवस प्रेक्षकांना आकाश चोप्रा यांची कॉमेंट्री ऐकता येणार नाही.
Caught and Bowled Covid. Yups…the C Virus has struck again. Really mild symptoms…all under control. 🤞
Will be away from the commentary duties for a few days…hoping to come back stronger 💪 #TataIPL— Aakash Chopra (@cricketaakash) April 4, 2023
याआधीही आकाश चोप्रा यांना कोरोना लागण झाली होती. त्यावेळी देखील त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती.
आकाश चोप्रा हा प्रसिद्ध भारतीय समालोचक आहे. ते आयपीएल २०२३ स्पर्धेत जिओ सिनेमासाठी हिंदी भाषेत सामालोचन करायचे. मात्र, आता आकाश चोप्रा समालोचन करणार नसल्याने नक्कीच चाहत्यांना त्यांची कमतरता जाणवणार आहे.