सुरत: काँग्रेसचे माजी लोकसभा खासदार राहुल गांधी यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मानहानी प्रकरणी सुरत सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरुद्ध राहुल गांधी यांनी आज याचिका दाखल केली होती.
‘सर्व चोरांची आडनावे मोदीच का असतात?’ या वक्तव्यावरुन त्यांना मानहानीच्या आरोपाखाली कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवले होते. आज त्यांनी न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध अपील दाखल केल्यानंतर ही सुनावणी झाली.
२४ मार्च रोजी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे नवी दिल्लीतील निवासस्थान रिकामे करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यासाठी त्यांना २२ एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान, जरी राहुल गांधींना जामीन मिळाला असला तरी न्यायालयाने ही शिक्षा रद्द न केल्यास ते पुढील ८ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतील.