मुंबई : शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असणारा डीएड कोर्स बंद होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा डीएड अभ्यासक्रम बंद करून आता बारावीनंतर ४ वर्षांचा इंटिग्रेटेड बीएड डिग्री कोर्स असणार आहे.
विद्यार्थ्यांना आता बारावीनंतर थेट ४ वर्षांचा हा डिग्रीचा कोर्स करता येणार आहे. जर विद्यार्थ्यांचा तीन वर्षांचा डिग्री कोर्स झाला असेल तर विद्यार्थ्यांना दोन वर्षांचा हा बीएड कोर्स करता येईल. तसेच जर विद्यार्थ्यांचा चार वर्षांचा डिग्री कोर्स झाला असेल किंवा मास्टर डिग्री झाली असेल तर विद्यार्थ्यांना १ वर्षाचा हा बीएड कोर्स करता येईल.
मात्र याबाबतची अंमलबजावणी कधी होणार हे अद्याप कळू शकलेले नाही. यावर्षी हा अभ्यासक्रम लागू होणार की पुढील वर्षी हा अभ्यासक्रम लागू होणार हे अद्याप कळू शकलेले नाही. शिक्षण विभागाकडून अद्याप याविषयीची कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.