Monday, April 21, 2025
Homeदेशसलीम दुर्रानी आणि गुजरातचे नाते अतुट, मोदींनी दिला आठवणींना उजाळा

सलीम दुर्रानी आणि गुजरातचे नाते अतुट, मोदींनी दिला आठवणींना उजाळा

मुंबई: भारताचे ज्येष्ठ क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहताना सलीम यांच्या गुजरातशी असलेल्या नात्याची आठवण काढली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या खेळाने भारतीय जनमानसाला क्रिकेटचे वेड लावले होते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सलीम यांना श्रद्धांजली अर्पण केली.

नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटले, , “जगातील भारतीय क्रिकेटचे नाव मोठे होण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. ते मैदानाबाहेरील व मैदानाच्या आतही त्यांच्या विशिष्ट शैलीसाठी ओळखले जायचे. त्यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. त्यांचे गुजरातशी जुने आणि अतूट नाते आहे. ते काही वर्षे गुजरात आणि सौराष्ट्रसाठी क्रिकेट खेळले होते.”

उपमुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणाले, आज क्रिकेट विश्वात भारताने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे, हे स्थान प्राप्त करण्यात ज्या क्रिकेटपटूंचे योगदान लाभले, त्यात सलीम दुर्रानी यांचे स्थान अग्रस्थानी आहे. प्रेक्षक षटकाराची मागणी करत आणि ते चेंडू सीमारेषेबाहेर भिरकावून देत. त्यांच्या निधनाने क्रिकेट क्षेत्राचा एक मोठा मार्गदर्शक हरपला आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होवो, हीच प्रार्थना.

भारताचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू अशी त्यांची ओळख होती. भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक आणि सुप्रसिद्ध खेळाडू रवी शास्त्रीही यांनीही सलीम यांचा एक जुना फोटो ट्विट करून त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -