पालघर: पालघरच्या किनाऱ्याजवळ संशयास्पद बोटीतून दोन पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. जलराणी असे यो बोटीचे नाव असून याबाबतची माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. मुंबई अरेबियन कोस्ट किनाऱ्याजवळ ही बोट दिसली. ही बोट नौदलाच्या हद्दीत सापडली आहे. त्यामुळे नौदलद्वारे कारवाई करण्यात येणार आहे.
आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास ही बोट दिसल्याचे सुत्रांनी सांगितले. मुंबई पोलीस बंदर क्षेत्राला सकाळी १० वाजता याची माहिती देण्यात आली. जॉइंट ऑपरेशन सेंटरने मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणांना माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर सर्व सागरी पोलीस ठाण्यांना सतर्क रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.