Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीशालिनी ठाकरे यांची सुषमा अंधारेंवर खोचक टिका, देवाची टिंगल करणारे.....

शालिनी ठाकरे यांची सुषमा अंधारेंवर खोचक टिका, देवाची टिंगल करणारे…..

मुंबई: वारकरी संप्रदायाबाबत ते स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत भडकाऊ विधाने करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधांरेंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांनी चांगलंच कैचीत पकडलंय. सुषमा अंधांरेंचा ‘तो’ फोटो ट्वीट करत त्यांनी अंधारेबाईंचा चेहरा सर्वांसमोर उघड केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून उद्धव ठाकरे गटात गेलेल्या सुषमा अंधारे अनेकदा सत्ताधाऱ्यांवर इतर पक्षांतील नेत्यांवर जळजळीत टीका करत असतात. याआधी त्यांनी हिंदूंवर निशाणा साधत देवाबाबत अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. पण सुषमा अंधारे सध्या स्वत:च देव पुजेला लागल्या आहेत. शालिनी ठाकरे यांनी त्यांचा देवपूजा फोटो ट्वीट करत त्यांच्यावर खोचक टिका केली आहे.

शालिनी ठाकरे म्हणाल्या, ”रामनवमी जोरात साजरी करा असं राजसाहेबांनी सांगितले आणि हिंदू देव देवतांची टिंगल करणारे पण आरती करू लागले.
बाई सुधारली… ”

शालिनीताई ठाकरे यांच्या ट्वीटनंतर समाजमाध्यमांवर चर्चेला एकच उधाण आले असून अनेकांनी याला सुषमा अंधारे या क्रुर महिला असून केवळ मतांच्या राजकारणासाठी असे करत असल्याचे म्हटले आहे. या ट्वीटवरुन, ‘करुन करुन भागले आणि देव पुजेला लागले’ या म्हणीचा प्रत्यय येत असल्याचीही चर्चा रंगली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -