Thursday, October 3, 2024
Homeक्रीडाIPL 2024पंजाबचा बल्ले बल्ले...

पंजाबचा बल्ले बल्ले…

डीएलएस मेथडने केकेआरवर ७ धावांनी विजय

मोहाली (वृत्तसंस्था) : भानुका राजपक्षे आणि शिखर धवन यांची दमदार खेळी त्याला मिळालेली अर्शदीप सिंगच्या भेदक गोलंदाजीची साथ आणि निर्णायक क्षणी पावसाने आणलेला व्यत्यय पंजाब किंग्सला फळला. पावसामुळे सामना पूर्ण होऊ न शकल्याने अखेर डकवर्थ लुईस मेथडने पंजाब किंग्सला ७ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या कोलकाताची सुरुवात अडखळत झाली. मनदीप सिंग आणि अनुकूल रॉय, रहमनउल्लाह गुरबाज हे फलंदाज स्वस्तात परतल्याने २९ धावांवर ३ फलंदाज बाद अशा संकटात संघ सापडला होता. व्यकंटेश अय्यर आणि कर्णधार नितिश राणा यांनी दमदार भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. व्यंकटेश अय्यरने ३४, तर नितिश राणाने २४ धावा जमवल्या. त्यानंतर आंद्रे रसेलने तुफानी फलंदाजी करत संघाला विजयाच्या वाटेवर आणून ठेवले. करनने रसलचा अडथळा दूर करत कोलकाताला पुन्हा अडचणीत टाकले. रसलने १९ चेंडूंत ३५ धावा जमवल्या. त्यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. १६ षटकांत ७ फलंदाजांच्या बदल्यात केकेआरने १४६ धावा केल्या होत्या. शार्दुल ठाकूर ८, तर सुनील नरेन ७ धावांवर खेळत होते, तेव्हा पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. अखेर पाऊस न थांबल्याने डकवर्थ लुईस मेथडने सामन्याचा निकाल लावण्यात आला. पंजाबच्या अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ बळी मिळवले.

कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मोहालीच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १९१ धावा केल्या. श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षेने ३२ चेंडूंत ५० धावा केल्या.

तर कर्णधार शिखर धवनने २९ चेंडूंत ४० धावांचे योगदान दिले. दोघांमध्ये ५५ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी झाली. तत्पूर्वी, सलामीवीर प्रभसिमरन सिंगने २३ धावा करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर शिखर धवन आणि भानुका राजपक्षे यांनी फलंदाजीची सूत्रे हाती घेत संघाला शंभर धावांचा टप्पा ओलांडून दिला. शेवटच्या षटकांमध्ये सॅम करनने १७ चेंडूंत नाबाद २६ धावा जमवत संघाच्या धावसंख्येला गती आणली. कोलकाताच्या टीम साउदीने २ बळी घेतले. उमेश यादव, सुनील नरेन व वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १ फलंदाज माघारी धाडला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -