पहिल्या विजयासाठी पंजाब, केकेआर सज्ज

मोहाली (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून पंजाब किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स एकमेकांविरुद्ध हंगामातील सलामीचा सामना खेळणार आहेत. शनिवारी मोहालीमध्ये हा सामना रंगणार आहे.


विशेष म्हणजे यंदा दोन्ही संघांमध्ये एक साम्य आहे. दोन्ही संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षक यंदा नवे आहेत. पंजाबने शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवली असून ट्रेवर बायलिस संघाचे प्रशिक्षक आहेत, तर दुसरीकडे दुखापतीमुळे यंदाच्या हंगामाला मुकलेला केकेआरचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरच्या जागी नितीश राणाकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे, तर चंद्रकांत पंडित यांच्या खांद्यावर संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे.


दोन्ही संघांतील महत्त्वाचे खेळाडू या लढतीला मुकणार आहेत. स्टार खेळाडू जॉनी बेअरस्टो संपूर्ण हंगामाला मुकणार आहे. लियाम लिव्हिंगस्टोन आणि कगिसो रबाडा पहिला सामना खेळणार नाहीत. त्यामुळे पंजाब प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थित मैदानात उतरेल.


केकेआरलाहीही झळ बसणार आहे. दुखापतीमुळे नियमित कर्णधार श्रेयस अय्यर संघाबाहेर आहे. त्यासोबत बांगलादेशचे शाकीब अल हसन आणि लिट्टॉन दासही पहिल्या सामन्यात खेळणार नाहीत. कारण, ते आपला राष्ट्रीय सामना खेळणार आहेत.


पंजाबने २०१४ पासून प्ले ऑफमध्ये प्रवेश केलेला नाही. यंदा त्यांनी सॅम करनला आयपीएलच्या इतिहासातील विक्रमी बोली लावत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.



वेळ : दुपारी ३.३०, ठिकाण : मोहाली

Comments
Add Comment

फुटबॉलच्या २०३४च्या विश्वचषकासाठी 'प्रोजेक्ट महादेवा' मधून गुणवान खेळाडू मिळतील : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा'चा

भारत जिंकला, टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानने टेकले गुडघे!

दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेत भारतीय युवा संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आपला दबदबा

दुबईत आज भारत-पाक हाय व्होल्टेज सामना

शतकवीर वैभव सूर्यवंशीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष दुबई : १९ वर्षांखालील आशिया चषक २०२५ क्रिकेट स्पर्धेत भारतीय

भारत - दक्षिण आफ्रिकेचा आज धर्मशालात महामुकाबला

मालिकेवरील वर्चस्वासाठी चुरस; १-१ बरोबरीमुळे महत्त्व मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ टी-२०

तिकीट काढूनही मेस्सीची झलक पाहायला मिळाली नाही; संतप्त चाहत्यांचा स्टेडियममध्ये तोडफोड

कोलकाता : GOAT India Tour अंतर्गत अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी १४ वर्षांनंतर भारतात आला. मेस्सीच्या

पंजाब किंग्सची धुरा श्रेयस अय्यरकडे?

रिकी पाँटिंगच्या अनुपस्थितीत संघ निवडण्याची जबाबदारीही येणार मुंबई  : बीसीसीआय सध्या आयपीएल २०२६ च्या मिनी