Tuesday, July 1, 2025

पहिल्या विजयासाठी पंजाब, केकेआर सज्ज

पहिल्या विजयासाठी पंजाब, केकेआर सज्ज

मोहाली (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून पंजाब किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स एकमेकांविरुद्ध हंगामातील सलामीचा सामना खेळणार आहेत. शनिवारी मोहालीमध्ये हा सामना रंगणार आहे.


विशेष म्हणजे यंदा दोन्ही संघांमध्ये एक साम्य आहे. दोन्ही संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षक यंदा नवे आहेत. पंजाबने शिखर धवनच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवली असून ट्रेवर बायलिस संघाचे प्रशिक्षक आहेत, तर दुसरीकडे दुखापतीमुळे यंदाच्या हंगामाला मुकलेला केकेआरचा नियमित कर्णधार श्रेयस अय्यरच्या जागी नितीश राणाकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे, तर चंद्रकांत पंडित यांच्या खांद्यावर संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे.


दोन्ही संघांतील महत्त्वाचे खेळाडू या लढतीला मुकणार आहेत. स्टार खेळाडू जॉनी बेअरस्टो संपूर्ण हंगामाला मुकणार आहे. लियाम लिव्हिंगस्टोन आणि कगिसो रबाडा पहिला सामना खेळणार नाहीत. त्यामुळे पंजाब प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थित मैदानात उतरेल.


केकेआरलाहीही झळ बसणार आहे. दुखापतीमुळे नियमित कर्णधार श्रेयस अय्यर संघाबाहेर आहे. त्यासोबत बांगलादेशचे शाकीब अल हसन आणि लिट्टॉन दासही पहिल्या सामन्यात खेळणार नाहीत. कारण, ते आपला राष्ट्रीय सामना खेळणार आहेत.


पंजाबने २०१४ पासून प्ले ऑफमध्ये प्रवेश केलेला नाही. यंदा त्यांनी सॅम करनला आयपीएलच्या इतिहासातील विक्रमी बोली लावत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.



वेळ : दुपारी ३.३०, ठिकाण : मोहाली

Comments
Add Comment