लखनऊ : लखनऊ सुपर जायंटसचा सलामीचा सामना शनिवारी दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये धावांसाठी झगडणाऱ्या लोकश राहुलला या सामन्यात धडाकेबाज कामगिरी करून फॉर्ममध्ये परतण्याची संधी आहे. तसेच संघाचा तो आधारस्तंभ असून संघालाही त्यांच्याकडून मोठ्या धावांची अपेक्षा आहे.
पंतच्या अनुपस्थितीत डेविड वॉर्नरच्या खांद्यावर नेतृत्वाची कमान आहे. त्याच्यासमोर आपल्या फलंदाजीसह संघाला विजयी करून देण्याचे आव्हान आहे. या दोन्ही आघाड्यांवर वॉर्नर यशस्वी ठरतो का? हे उद्याचा सामन्यात कळेल.
वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोवमन पॉवेल, रिली रोझवू यांच्यावर खासकरून दिल्लीच्या फलंदाजीची जबाबदारी असेल.