नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कंपन्यांनी ९१.५० रुपयांची कपात केली आहे. यामुळे आजपासून दिल्लीत हा गॅस सिलिंडर २,०२८ रुपयांना मिळणार आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मार्चमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती ३५० रुपयांनी वाढविल्या होत्या. आता त्यातील ९१.५० रुपये घटविले आहेत. यामुळे व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
या कपातीनंतर विविध शहरांतील दरांतही बदल झाले आहेत. कोलकातामध्ये २१३२ रुपये, मुंबईत १९८० रुपये, चेन्नईमध्ये २१९२.५० रुपये अशा किंमती झाल्या आहेत. तर घरगुती गॅसचे दर जैसे थेच आहेत.