मुंबई : महागाईने होरपळून निघालेल्या वीज ग्राहकांना आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी वीज दरवाढीचा शॉक बसला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, बेस्ट, अदानी आणि टाटा पावरच्या वीज दरात वाढ झाली आहे. घरघुती वीजेच्या दरात सहा टक्क्यांची वाढ झाली आहे.
आर्थिक तोटा भरुन काढण्यासाठी महावितरण कंपनीने आर्थिक भार वीज ग्राहकांवरच टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
महावितरणने ग्राहकांना २०२३-२४ मध्ये सरासरी २.९ टक्के तर २०२४-२५ साठी ५.६ टक्के दरवाढ केली आहे. घरगुती वीजेच्या दरात २०२३-२४ साठी सहा टक्के तर २०२४-२५ साठी सहा टक्के वाढ झाली आहे.
तर बेस्टच्या ग्राहकांना २०२३-२४ साठी वीज दरात सुमारे ५.०७ टक्के तर २०२४-२५ साठी ६.३५ टक्के अधिक मोजावे लागणार आहेत.
टाटा पावरच्या ग्राहकांना सरासरी २०२३-२४ साठी ११.९ टक्के वाढ झाली आहे. तर २०२४-२५ साठी १२.२ टक्के वाढ झाली आहे.
अदानी इलेक्ट्रिसिटीच्या ग्राहकांना २०२३-२४ साठी सरासरी २.२ टक्के तर २०२३-२४ साठी २.१ टक्के अधिक मोजावे लागणार आहेत.
सध्या राज्यात उन्हाळा चांगलाच वाढला आहे. तापमानाचा पारा वाढल्याने वीजेच्या मागणीत देखील वाढ झाली आहे.