Monday, March 24, 2025
Homeक्रीडाIPL 2024लखनऊसमोर दिल्ली नतमस्तक

लखनऊसमोर दिल्ली नतमस्तक

कायले मायर्स, मार्क वुड यांची चमकदार कामगिरी

लखनऊ (वृत्तसंस्था) : कायले मायर्सचे धडाकेबाज अर्धशतक आणि मार्क वुडची अविस्मरणीय गोलंदाजी लखनऊ सुपर जायंट्सच्या विजयात विशेष ठरली. या यशस्वी कामगिरीसह लखनऊने शनिवारी यंदाच्या हंगामातील सलामीच्या सामन्यातच पहिल्या विजयाची नोंद केली.

प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर यांनी संघाला बरी सुरुवात करून दिली. अवघ्या १२ धावा करून पृथ्वीने वॉर्नरची साथ सोडली. मिचेल मार्श, सर्फराज खान स्वस्तात परतले. त्यामुळे विकेट गमावण्यासह धावांची गतीही कमी झाल्याने दिल्लीचा संघ अडचणीत आला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिले रोसूवने २० चेंडूत ३० धावा जमवत वॉर्नरला छान साथ दिली होती. परंतु रवि बिश्नोईच्या सापळ्यात तो अडकला आणि दिल्लीने सेट झालेला फलंदाज गमावला. त्यानंतर रोवमन पॉवेल, अमन हकीम खान आल्यासारखे पटकन माघारी परतल्याने दिल्लीचा संघ पुन्हा अडचणीत आला.

एका बाजूने कर्णधार डेविड वॉर्नर धावा जमवत होता, परंतु दुसऱ्या बाजूचा फलंदाज मैदानात थांबत नसल्याने चेंडू आणि धावा यातील अंतर वाढत गेले. त्यामुळे दबाव वाढत गेल्याने अखेर फटकेबाजी करण्याच्या नादात वॉर्नरचा संयम सुटला. त्याने ४८ चेंडूंत ५६ धावांची संघातर्फे सर्वाधिक धावांची खेळी खेळली. त्यानंतर दिल्लीचा पराभव जवळपास निश्चित झाला. केवळ औपचारिकता शिल्लक होती. दिल्लीचा संघ २० षटकांत ९ फलंदाजांच्या बदल्यात १४३ धावाच करू शकला. मार्क वुडने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.

काइल मेअर्सच्या तुफानी फटकेबाजीच्या बळावर लखनऊ संघाने निर्धारित २० षटकांत सहा विकेटच्या मोबदल्यात १९३ धावा केल्या. काइल मेअर्स याने संघातर्फे सर्वाधिक ७३ धावांचे योगदान दिले. त्याने अवघ्या ३८ चेंडूंत २ चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. हाणामारीच्या षटकांमध्ये निकोलस पुरनने धावांचा पाऊस पाडला. त्याने अवघ्या २१ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकार लगावत ३६ धावा खात्यात जमा केल्या. त्यामुळे लखनऊला १९३ धावांपर्यंत मजल मारता आली.

कर्णधार लोकेश राहुलसह लखनऊच्या अन्य फलंदाजांना प्रभावशाली फलंदाजी करता आली नाही. दिल्लीकडून खलील अहमद आणि चेतन सकारीया यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर अक्षर पटेल, कुलदीप यादव यांनी १-१ बळी मिळवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -