राजापूर : राजापूर तालुक्यातील होळीचा मांड धामणपे येथे राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे. ही स्पर्धा रविवार दिनांक २ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. या शर्यतीमध्ये ‘विना फटका’चा प्रयोग ही अट प्रत्येक स्पर्धकाला घातली गेली आहे.
या बैलगाडी शर्यती संदर्भात धामणपे ग्राम विकास मंडळ, मुंबईचे सरचिटणीस संजय तावडे म्हणाले की, न्यायालयाच्या नियम अटींचे पालन करीत या शर्यती पार पडणार आहेत. ही बैलगाडी शर्यत मधुकरराव गोमणे यांनी पुरस्कृत केली आहे. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित रहाणार आहे. या बैलगाडी विजेतेपद पटकाविणाऱ्यांना प्रथम क्रमांकाला ३० हजाराचे बक्षीस, द्वितीय क्रमांकाला २५ हजाराचे बक्षीस तर तृतीय क्रमांकाला २० हजाराचे बक्षीस व मानाची ढाल देण्यात येणार आहे. चौथ्या क्रमांकापासून ते नवव्या क्रमांकापर्यंत रोख पारितोषिके व मानाची ढाल देण्यात येणार आहे.
बैलगाडा शर्यतीचा प्रचंड उत्साह असून मुंबईकर चाकरमानी सुद्धा या शर्यती पहाण्यासाठी निघाले आहेत.