Monday, March 24, 2025
Homeमहाराष्ट्रठाणे'रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांची ताकद पणाला'

‘रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांची ताकद पणाला’

ठाणे: शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांच्यावर सनसनाटी आरोप केला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार यांनी ताकद पणाला लावली होती, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात अभिषेक बोके (शरद पवार यांच्या भगिनीचे नातू) हे निवडणुकीच्या मैदानात होते. त्यामुळे नातू विरुध्द नातूच्या लढतीत अजित पवारांनी रोहित पवारांना पाडण्याचा प्रयत्न केल्याचे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या काळात पवार कुटुंबातील एक व्यक्ती रोहित पवारांना पाडा, म्हणून सर्वांना फोन करत होती. अजित पवार साहेब आधी आपलं बघा, नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा. रोहित पवारांना पाडण्यासाठी तुम्ही कोणाकोणाला फोन केले आणि निरोप दिले ते सांगा. आधी याची कल्पना लोकांना द्या, नंतर आमच्यावर टीका करा.

जानेवारी महिन्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक झाली होती. संलग्न क्लबमधून आमदार रोहित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. एकूण २४ मतदारांपैकी पवार यांना २२, तर सुनील संपतलाल मुथा यांना २१ मते पडली होती. तर शरद पवारांचे दुसरे नातू अभिषेक बोके यांना तीन, तर शंतनू सुगवेकर यांना अवघ्या दोन मतांवर समाधान मानावे लागले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -