Monday, May 12, 2025

ताज्या घडामोडीठाणे

खड्ड्याने घेतला वाहतूक पोलिसाचा बळी! ट्रकने दोघांना चिरडले!

खड्ड्याने घेतला वाहतूक पोलिसाचा बळी! ट्रकने दोघांना चिरडले!

भिवंडी : भिवंडीत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक पोलिसांच्या दुचाकीचा तोल गेल्याने दुचाकीसह दोन वाहतूक पोलीस ट्रकखाली चिरडल्याची दुर्दैवी घटना टेमघर परिसरात घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


या अपघातात ट्रकखाली चिरडल्याने भादवड येथे रहाणारे भाऊसाहेब कुंभारकर (४०) या वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू झाला. तर कल्याणमधील पोलीस हवलदार सुजय शिवाजी नाईक (४२) गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही नारपोली वाहतूक शाखेत कार्यरत आहेत.


शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत पोलीस हवालदार नाईक यांना खाजगी रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रक व ट्रक चालकास ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment