Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडी'दही' या शब्दाला तामिळनाडू सरकारचा विरोध

‘दही’ या शब्दाला तामिळनाडू सरकारचा विरोध

चेन्नई (प्रतिनिधी): तामिळनाडूमध्ये आता दह्यावरून वाद सुरू झाला असून पाकिटावर दही हा हिंदी शब्द लिहू नका, त्याऐवजी तायिर हा तामिळ शब्द लिहा असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी म्हटले आहे. त्यानंतर दह्याच्या पाकिटावर आता यापुढे तायिर हा शब्द लिहिण्यात येईल असे राज्यातील दूध उत्पादक संघ आवीनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिटावर दही हा हिंदी शब्द लिहिण्याचे निर्देश म्हणजे तामिळ जनतेवर हिंदी लादण्याचा प्रकार असल्याचा आरोप मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी केला होता.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने पाकिटावरील कर्ड हा इंग्रजी शब्द काढून त्यावर दही हा हिंदी शब्द लिहिण्याची सूचना केली होती. त्याविरोधात तामिळनाडूमध्ये लोकांचा असंतोष वाढला. तामिळी जनतेवर हिंदी लादण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांनी दक्षिण भारतातील लोकांवर हिंदी लादल्याचा आरोप केला आहे. सरकारच्या हस्तक्षेपानंतर राज्याचे दूध विकास मंत्री एसएम नासर यांनी एफएसएसएआयला पत्र लिहिले आहे.

दरम्यान,मुख्यमंत्री एम के स्टॅलिन म्हणाले की, केंद्राचा हिंदी लादण्याचा प्रयत्न इतका वाढला आहे की आम्हाला पाकिटावर दही हा हिंदी शब्द लिहिण्याच्या सूचना देण्यात आल्या. हिंदीच्या या धोरणांमुळे दक्षिण भारतातील भाषा मागे पडत आहेत. राज्यावर हिंदी लादण्याचा प्रकार म्हणजे आमच्या मातृभाषेचा अपमान करण्यासारखं आहे. अशांना राज्यातून कायमचे हाकलून दिले जाईल
दही आणि कर्ड दोन्ही वेगळे, मंत्र्यांचा युक्तिवाद

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाची ही अधिसूचना मागे घेण्याची मागणी राज्याच्या दूग्ध विकास मंत्र्यांनी केली आहे. राज्यात हिंदीला स्थान नाही. दही ही एक सामान्य संज्ञा आहे जी कोणत्याही भाषेत वापरली जाऊ शकते. दही हा विशेष पदार्थ असून त्याची चव कर्डपेक्षा वेगळी असते. मंत्र्यांनी ऑगस्टपूर्वी नाव बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -