Monday, July 22, 2024
Homeदेशपंतप्रधान मोदींची संसदेला अचानक भेट, पाहा फोटो

पंतप्रधान मोदींची संसदेला अचानक भेट, पाहा फोटो

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी संसदेच्या नवीन इमारतीला भेट दिली आणि घटनास्थळाची पाहणी करत तब्बल तासभर तेथील कामगारांशी संवाद साधला. पाहुयात या भेटीची क्षणचित्रे…

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि नागरी व्यवहार सचिव मनोज जोशी यांच्यासमवेत पंतप्रधान मोदींनी संसदेच्या दोन्ही सभागृहात येणाऱ्या विविध सुविधांचा आढावा घेतला.

नव्या संसद भवनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबर २०२० रोजी नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात पायाभरणी केली होती.

आगामी संसद संकुलाच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी अचानक तपासणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये अशीच भेट दिली होती.

नवीन संसदेच्या इमारतीचे काम जवळजवळ तयार आहे. पण काही कलाकुसर आणि उपकरणांची चाचणी बाकी आहे.

संसदेच्या नवीन इमारतीत एकावेळी १२०० हून अधिक खासदार बसण्याची सोय आहे. यामध्ये लोकसभेत ८८८ तर राज्यसभेत ३८४ खासदार बसू शकतात. नवीन इमारतीत एक सुंदर संविधान कक्षही बांधण्यात आला आहे.

केंद्र सरकारने २०१९ मध्ये सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्प सुरू केला, ज्यामध्ये नवी दिल्लीतील संसदेच्या नवीन इमारतीचसह काही अन्य बांधकामाचा समावेश आहे.

मीडिया रिपोर्टनुसार हे काम टाटा प्रोजेक्ट्सला २०२० मध्ये ८६१.९ कोटी रुपयांना देण्यात आले होते. ज्याची किंमत नंतर वाढवून सुमारे १ हजार २०० कोटी रुपये करण्यात आली.

या संसद भवनामध्ये देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यातील कलाकृतींचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक कामाचा तपशीलवार आढावा घेतला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -