Thursday, September 18, 2025

श्री काशीविश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी परिसराचा कायापालट करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

श्री काशीविश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी परिसराचा कायापालट करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास करणार असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

दरम्यान त्यासाठी मुंबादेवी मंदिर डेव्हलपमेंट ऑथिरीटी प्राधीकरणाची स्थापना करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

गुरुवारी त्यांनी मुंबादेवीच्या दर्शनानंतर मुंबादेवी येथील परिसराची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,आमदार सदा सरवणकर, डॉ. दीपक सावंत, राज पुरोहित, आकाश पुरोहित, अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारासू आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबादेवी हे प्राचीन मंदिर असून याप्रती सर्वांनाच श्रद्धा,आस्था आणि प्रेम आहे. मुंबादेवी मंदिर परिसरात अनेक भक्तगण भेट देत असतात. काशी विश्वनाथ मंदिर व उज्जैनस्थित महाकाल मंदिर कॉरिडॉर, तिरूपती देवस्थानांच्या धर्तीवर विकास करण्यात यावा, अशी मागणी मुंबईकरांची असून या परिसरात अत्यावश्यक सोयी सुविधा, तसचे दर्शन रांगा, पार्किंग व येथे आवश्यक त्या परिसराच्या विकासाबाबत शासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment