Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीराज्यात मनसुख हिरेन, सुशांत सिंग प्रकरणाची पुनरावृत्ती

राज्यात मनसुख हिरेन, सुशांत सिंग प्रकरणाची पुनरावृत्ती

भाजपा नेते मोहित कंबोज यांची चौकशीची मागणी

“जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या नव्हे, खून झालाय”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डने आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नसून खून आहे, असा आरोप आता भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा अंगरक्षक आणि मुंबई राखीव पोलीस दलातील कर्मचारी वैभव कदम याने आत्महत्या केली आहे. मात्र ही हत्या असल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे. करमुसे प्रकरणात आधी आरोपी असणारा आणि आता माफीचा साक्षीदार बनायची तयारी दर्शवलेल्या वैभव कदमचा मृतदेह सापडल्याने कंबोज यांनी शंका व्यक्त केली आहे.

कदम हा जितेंद्र आव्हाडांचा सुरक्षारक्षक होता. एवढ्या मोठ्या हायप्रोफाईल प्रकरणातल्या आरोपीचा असा संशयास्पद मृत्यू होतो. राज्यात अजून एक मनसुख हिरेन आणि सुशांत सिंग राजपूत सारखे प्रकरण झालेय, असा आरोप कंबोज यांनी केला आहे.

माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, वैभव कदम प्रकरणी तात्काळ एफआयआर नोंदवावा, आमचे रक्षण करणारे पोलीस सुरक्षित नाहीत किंवा त्यांना न्याय मिळणार नसेल तर जनतेचे काय? असा सवालही कंबोज यांनी केला आहे.

या प्रकरणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तात्काळ कारवाई करण्याची मागणी कंबोज यांनी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -